हरियाली कबाब: हरियाली कबाब किंवा ह्याला हरेभरे कबाब सुद्धा म्हणता येईल. हे कबाब नाश्त्याला किंवा स्टारटर म्हणून सुद्धा बनवता येतील. हे कबाब फार पौस्टिक आहेत ह्यामध्ये प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कँलरिज, अँटीआँकसीडटस, व्हिठ्यामीन, प्रोटीन भरपूर प्रमाणात आहेत. तसेच महत्वाचे म्हणजे ज्यांना ह्रुदय विकाराचा त्रास आहे व वजन जास्त आहे तसेच मधुमेह आहे त्यांना हे कबाब उत्तम आहेत.
लहान मुलांना हे कबाब खूप आवडतील.
The English language recipe of the making of this Kabab can be seen here – Delicious Hariyali Kabab
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य:
१/४ कप राजमा
१/४ कप काबुली चणे/ छोले
१ टे स्पून मटार ताजे
१/२ कप किसलेले गाजर
१/२ कप पालक (चिरून)
१/४ कप पुदिना (चिरून)
१” आले
८ लसूण पाकळ्या
५ हिरव्या मिरच्या
१ टे स्पून लिंबूरस
१ टी स्पून गरम मसाला
३ ब्रेड स्लाईस (ब्रेड क्रम)
मीठ चवीने
कृती:
राजमा व छोले धुवून आदल्या दिवशी रात्री भिजत घाला व सकाळी प्रेशर कुकरमध्ये चांगले शिजवून घ्या. शिजल्यावर मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर वाटून घ्या.
किसलेले गाजर, मटार, व चिरलेल्या पालकची पाने शिजवून घ्या. हिरव्या मिरच्या, आले-लसूण पेस्ट करून घ्या.
शिजवून वाटलेले राजमा व छोले, शीजेलेले पालक, हिरव्या मिरची, आले-लसूण पेस्ट, गरम मसाला, लिंबूरस, चिरलेली कोथंबीर, पुदिना, मीठ घालून चांगले मिक्स करून घेवून त्याचे एक सारखे पंधरा चपटे गोळे बनवा. एक एक गोळा घेवून ब्रेड क्रम मध्ये घोळून घ्या.
नॉन स्टिक तवा गरम करून तव्याला थोडेसे तेल लावा. मग तव्यावर बनवलेले चपटे गोळे लाऊन घ्या. कडेनी थोडे थोडे तेल सोडून छान कुरकुरीत शालो फ्राय करा.
गरम गरम कबाब टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.