व्हेजिटेरियन सॉसेजीस: व्हेजिटेरियन सॉसेजीस किंवा ह्याला अजून एक नाव आहे क्रॉमेकीज सुद्धा म्हणतात. हे एक कबाबा सारखीच रेसिपी आहे. व्हेजिटेरियन सॉसेजीस बनवतांना श्रावण घेवडा, बटाटा, मटार व गाजर वापरले आहे. ह्या भाज्या पौस्टिक आहेत ते आपल्याला माहीत आहेच. व्हेजिटेरियन सॉसेजीस नाश्त्याला किंवा स्टारटर म्हणून किंवा जेवणात तोंडी लावायला सुद्धा छान आहेत.
The English language version of this Veg Sausage preparation method can be seen here- Crispy Veg Sausage
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: १५ सॉसेजीस
साहित्य
१५ श्रावण घेवडा शेंगा
२ मोठे बटाटे
१ कप हिरवे ताजे मटार
१ मोठे गाजर
१ टे स्पून आले-लसूण पेस्ट
४- हिरव्या मिरच्या (वाटुन)
१ अंडे (फेटून)
४ ब्रेड स्लाईस (क्रम)
१ टी स्पून लिंबूरस
१/४ कप कोथंबीर (चिरून)
१ कप व्हाईट सॉस
मीठ चवीने
व्हाईट सॉस कसा बनवायचा
१ टे स्पून लोणी
२ टे स्पून मैदा अथवा गव्हाचे पीठ
1 ¼ कप दुध
मीठ चवीने
१/४ टी स्पून मिरे पावडर
तेल तळण्यासाठी
कृती:
प्रथम व्हाईट सॉस बनवून घ्या. कढईमधे बटर गरम करून मैदा हळूहळू घालून २-३ मिनिट हलवत रहा. गुलाबी रंगावर मैदा अथवा गव्हाचे पीठ परतून झाला की थोडे थोडे दुध घालून हलवत रहा गुठळी होऊ देऊ नका. मैदा शिजला की त्यामध्ये मीठ व मिरे पावडर घालून मिक्स करा.
बटाटे उकडून, सोलून घ्या. श्रावण घेवडा चिरून थोडा शिजवून घ्या. गाजर किसून घ्या. मटार थोडेसे ठेचून घ्या.
मग उकडून किसलेले बटाटे, शिजलेला श्रावण घेवडा, ठेचलेले मटार, किसलेले गाजर, आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कोथंबीर, व्हाईट सॉस, लिंबूरस, मीठ घालून मिक्स करून घ्या. व त्याचे एकसारखे लांबट आकाराचे १५ गोळे बनवून घ्या. म्हणजे सॉसेजेसचा आकार द्या.
एक अंडे फेटून घ्या. व ब्रेड स्लाईसचा मिक्सरमध्ये क्रम बनवून घ्या.
एक एक सॉसेजेस घेऊन फेटलेल्या अंड्यामध्ये घोळवून ब्रेडक्रम मध्ये घोळून घ्या.
कढई मध्ये तेल गरम करून सॉसेजेस छान गुलाबी रंगावर तळून घ्या.
गरम गरम व्हेजिटेरियन सॉसेजीस टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.