गाजर म्हंटले की लाल बुंद किंवा केशरी रंगाची गाजर आपल्या डोळ्या समोर दिसतात. गाजर हे एक आपल्याला आरोग्याचे वरदान आहे. गाजरामध्ये खूप शक्ती आहे. गाजर हे फळ व भाजीही आहे. गाजराचा कोणताही पदार्थ बनवलेला चवीला चांगला लागतो व दिसायला पण छान दिसतो.
गाजर हे चवीला मधुर, हलके, जुलाबात गुणकारी तसेच कफ व वायू दूर करणारे आहे.
गाजरामध्ये जीवनसत्व ‘ए” विपुल प्रमाणात आहे. तसेच प्रोटीन, कर्बोहायड्रेत, फॉस्फरस असते. गाजराच्या सेवनाने डोळ्यांना खूप फायदा होतो. लोह वेपूल प्रमाणात आहे त्यामुळे रक्त वाढते व रक्त शुद्धी होते. त्वचा रोगात फायदा होतो.
महागडी फळे खाण्यापेक्षा स्वत गाजरे खाऊन आपल्या शरीराला पुष्कळ पोषक घटक मिळतात. गाजराची कोशंबीर खाल्यामुळे ग्यास निघून जातो. आपली त्वचा छान मुलायम होते.
आपल्या शरीरातील जीवनसत्व “ए” कमी झाले तर शरीराची वाढ खुंटते, शरीराची क्षमता कमी होते. अन्न पचायला वेळ लागतो. त्वचा खरखरीत होते, रात्री नीट दिसत नाही. आपली हाडे नरम होतात. त्यासाठी लहानमोठ्या सर्वानी गाजराचे सेवन करणे जरुरीचे आहे.
गाजर अगदी अतिरिक्त प्रमाणात खाऊ नये. त्यामुळे पोटात दुखू शकते. गाजर खाल्यावर लगेच पाणी पिऊ नये त्यामुळे खोकला येतो.