बदामाचे आप्पे: बदामाचे आप्पे हा एक गोड नाश्त्याला बनवण्याचा पदार्थ आहे. आपण तिखट व गोड नारळाच्या दुधातील आप्पे बनवतो. बदामाचे आप्पे ही एक वेगळी छान रेसिपी आहे. ह्यामध्ये बदामाची पेस्ट ,मैदा, साखर, व अंडे वापरले आहे. अंडे घातल्यामुळे हे आप्पे छान फुलून येतात. तसेच जायफळ घातल्यामुळे अंडे वापरले आहे ते समजत सुद्धा नाही.
The English language version of this Maharashtrian Appe recipe and the preparation method can be seen here – Tasty Almond Appe
बनवण्यासाठी वेळ: ४५
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
एक कप मैदा
२० बदाम
२ अंडी (फेटून)
१ टे स्पून
१/२ कप साखर
१/४ कप बटर
१/४ टी स्पून जायफळ पूड
१/४ टी स्पून व्ह्नीला ईसेन्स
मीठ चवीने
तेल शालो फ्राय करण्यासाठी
कृती:
बदाम अर्धा तास भिजत ठेवा मग सोलून घ्या. एका कढईमध्ये वाटलेले बदाम, साखर व दुध मिक्स करून मंद विस्त वावर घट्ट परंत शिजवायला ठेवा. मिश्रण घट्ट झालेकी विस्तवावरून कढई खाली उतरवून त्यामध्ये मैदा, फेटलेले अंडे, बटर, जायफळ पूड, व्ह्नीला ईसेन्स व मीठ घालून मिश्रण एक सारखे करून घ्या.
आप्पे पात्र गरम करून थोडेसे तेल घालून त्यामध्ये एक एक मोठा चमचा मिश्रण घालून मंद विस्तवावर भाजून घ्या.
गरम गरम आप्पे सर्व्ह करा.