दुधी भोपळ्याच्या सालांची चटणी: दुधीभोपळा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. दुधीभोपळा हा थंड, कफनाशक, रुची उत्पन्न करणारा आहे. दुधी भोपळ्याच्या सेवनाने मेंदूला शक्ती मिळते. अशक्त लोकांसाठी दुधीभोपळ्या एक उत्तम आहे कारण ह्यामध्ये आपल्या शरीराला लागणारी पोषक मुल्ये ह्या मध्ये आहेत.
दुधीभोपळ्या ही एक अशी फळभाजी आहे की ह्याचा सगळ्या भागांचा उपयोग करता येतो. दुधीभोपळ्या च्या सालींची चटणी करता येते. (दुधीभोपळ्याची साले फेकून न देता त्याची चटणी बनवावी), भाजी करता येते.
The English language version of this Dudhi Bhopla Chatni can be seen here- Bottle Gourd Skin Chatni
बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ कप दुधीभोपळ्याची साले
१ टी स्पून तेल
२ हिरव्या मिरच्या
१ टे स्पून कोथंबीर
१ टी स्पून आले
१/४ कप नारळ (खोऊन)
२ टे स्पून शेगदाणे
१ टी स्पून जिरे
१ टी स्पून लिंबूरस किंवा २ टे स्पून दही
साखर व मीठ चवीने
कृती:
दुधीभोपळ्याची साले धुऊन चिरून घ्या. तव्यावर तेल गरम करून त्यावर दुधीभोपळ्याची साले परतून घ्या. थंड झाल्यावर त्यामध्ये हिरव्या मिरच्या, कोथंबीर, आले, नारळ, शेगदाणे, जिरे, मीठ घालून पाट्यावर बारीक वाटुन घ्या.
चटणी वाटल्यावर त्यामध्ये लिंबूरस किंवा दही घालून मिक्स करा.
दुधीभोपळ्याची चटणी इडली किंवा डोश्या बरोबर सुद्धा छान लागते.
लाल भोपळा,पपया व कलिंगड साल यांपैकी काही भागांची चटणी,भाजी होऊ शकते का?