Gajarachi Tikhat Chutney Recipe in Marathi

Gajar
Carrot

गाजराची तिखट चटणी: गाजराची चटणी चवीला छान आंबट-गोड लागते. ही चटणी दिसायला पण छान दिसते. जेवणामध्ये तोंडी लावायला चांगली आहे. गाजराचा आपण भाजी साठी किंवा फळ म्हणून सुद्धा उपयोग करतो. गाजराची आपण कोशंबीर बनवतो तसेच त्याची चटणी सुद्धा चांगली लागते. ह्या चटणीमध्ये चिंच-गुळ, हिंग, घातला आहे त्यामुळे त्याची चव उत्कृष्ट लागते. नारळ घातल्यामुळे चटणीची चव अजून चांगली लागते.

The English language version of the recipe and preparation method of this Gajar Chatni can be seen here – Maharashtrian Carrot Chatni

बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी

साहित्य:
४ लाल चुटूक गाजरे (मोठी)
३ हिरव्या मिरच्या (चिरून)
१/४ कप नारळ
१ टे स्पून कोथबीर (चिरून)
१ टी स्पून चिंच
२ टी स्पून
१/४ टी स्पून हिंग
मीठ चवीने

Gajar
Carrot

कृती:
गाजर धुवून, किसून घ्या, हिरवी मिरची चिरून घ्या, नारळ खोऊन घ्या, कोथंबीर चिरून घ्या.
किसलेले गाजर, हिरवी मिरची, नारळ, चीन-गुळ, मीठ, हिंग घालून चटणी वाटुन घ्या. वाटलेली चटणी बाऊलमध्ये काढून घ्या. मग त्यामध्ये चिरलेली कोथबीर घालून मिक्स करा. चपाती बरोबर चटणी सर्व्ह करा.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.