Kashmiri Dalimb Chutney Recipe in Marathi

Kashmiri Pomegranate Seeds
Pomegranate Seeds

कश्मीरी डाळींबाची चटणी: कश्मीरी डाळींबाची चटणीही कश्मीरी पद्धतीने बनवली आहे. ह्यामध्ये डाळीं बाचे ताजे दाणे वापरले आहे. तसेच कांदा, कोथंबीर व पुदिना वापरला आहे. पुदिन्यामुळे चटणीला छान सुगंध व चव येते. चाट मसाला वापल्यामुळे वेगळी चव येते. हे चटणी समोसे, वडे ह्या बरोबर उत्कृष्ट लागते.

The English language version of this Kashmiri Chutney Recipe and its preparation method can be seen here – Kashmiri Pomegranate Seeds Chutney

बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी

साहित्य:
१ कप डाळींबाचे दाणे
१/२ कप कोथंबीर
१/४ कप पुदिना पाने
१ छोटा कांदा
२ हिरव्या मिरच्या (लहान)
१ टी स्पून जिरे
१/२ टी स्पून चाट मसाला
१/२ टी स्पून लिंबूरस
मीठ व साखर चवीने

Kashmiri Pomegranate Seeds
Pomegranate Seeds

कृती:
कोथंबीर, पुदिना पाने धुवून चिरून घ्या. हिरवी मिरची चिरून घ्या. कांदा बारीक चिरून घ्या. जिरे कुटून घ्या.
डाळींबाचे दाणे, कोथंबीर, पुदिना, हिरवी मिरची, कांदा, जिरे, चाट मसाला, लिंबूरस, मीठ, साखर व ३-४ टे स्पून पाणी घालून मिक्सरमध्ये चटणी बारीक वाटून घ्या.

कश्मीरी डाळींबाची चटणी सामोसा किवा वड्या बरोबर छान लागते.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.