लाल भोपळ्याच्या शंकरपाळ्या: लाल भोपळ्याच्या शंकरपाळ्या दिवाळीच्या फराळाचेवेळी सुद्धा बनऊ शकतो. ह्या शंकरपाळ्या बनवतांना तांबडा भोपळा, गव्हाचे पीठ व गुळ वापरला आहे. गोड पदार्थ बनवतांना साखर आपण वापरतो. पण गुळ जास्त वापरला जात नाही. गुळ हा पौस्टिक आहे व तो आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे.
The English language version of this Shankarpali can be seen here- Pumpkin Shankarpali
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ४-६ जणासाठी
साहित्य:
२ कप लाल भोपळा (किसून)
४ कप गव्हाचे पीठ
१ १/२ कप गुळ
१/४ कप तेल (गरम)
मीठ चवीने
तेल शंकरपाळ्या तळण्यासाठी
कृती:
तांबडा भोपळा स्वच्छ करून धुऊन किसून घ्या. मग भांड्यात कीस घेवून मंद विस्तवावर वाफवून घेऊन थंड करायला ठेवा. गुळ किसून घ्या. शिजवलेला लाल भोपळा, मीठ व गुळ मिक्स करून त्यामध्ये गव्हाचे पीठ घालून मिक्स करून घेऊन त्यामध्ये गरम तेल घालून घट्ट पीठ मळून घ्या (पाणी वापरायचे असेल तर हळूहळू घाला). मळलेले पीठ १०-१५ मिनिट तसेच झाकून ठेवा. मळलेल्या पीठाचे एक सारखे ४ गोळे बनवून पोळी सारखे लाटून शंकरपाळीचा आकार देऊन करून घ्या. अश्या सर्व् शंकरपाळ्या बनवून घ्या.
कढईमधे तेल गरम करून घ्या. गरम तेलामध्ये थोड्या थोड्या बनवलेल्या शंकरपाळ्या गुलाबी रंगावर तळून घ्या. थंड झाल्यावर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.