मठ्ठा: मठ्ठा हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पेय आहे. उन्हाळ्याच्या दिवसात मठ्ठा आवर्जून बनवतात. मठ्ठा हा आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. महाराष्ट्रात मठ्ठा हा लग्न समारंभाच्या वेळी जेवणात अगदी आवर्जून बनवला जातो. मठ्ठा व जिलेबी हे एक कॉम्बीनेशन आहे. मठ्ठा बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे. मठ्ठा बनवण्याची ही एक बेसिक पद्धत आहे. अश्या प्रकारे झटपट दही बनवल्या नंतर त्यामध्ये फक्त मसाला घालायचा.
The English language version of the Mattha recipe and its preparation method can be seen here- Making Basic Mattha
बेसिक मठ्ठा बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट’
वाढणी: २ जणासाठी
साहित्य:
५०० मिली लिटर ताजे दुध
१ टे स्पून लिंबूरस
कृती:
प्रथम दुध गरम करून थंड करायला ठेवा. दुध थंड करतांना ते थोडे कोमट असायला पाहिजे. मग त्यामध्ये लिंबूरस घालून मिक्स करून १५ मिनिट बाजूला झाकून ठेवा म्हणजे त्याचे दही जमेल. दही जमल्यावर ते चाळणीवर कपडा ठेऊन गळून घ्या. म्हणजे जास्तीचे पाणी निघून जाईन. हे मठ्ठा बनवण्याचे ताक तयार झाले.
आता आपल्याला बनवलेल्या दह्याचा मठ्ठा बनवता येतो.
लेमन फ्लेवर मठ्ठा
बनवण्यासाठी वेळ: १५
वाढणी: १ जण
साहित्य:
१ कप दुध
१ टे स्पून लिंबूरस
१ टी स्पून साखर
कृती:
दुध व साखर मिक्स करून दुध गरम करून घ्या. मग त्यामध्ये लिंबूरस घालून मिक्स करून दुध परत गरम करायला ठेवा.
मग चाळणी वर एक कपडा ठेवून गरम दुध कपड्यावर ओता. जास्तीचे पाणी ग्लासमध्ये ओतुन सर्व्ह करावे. व घट्ट दही तसेच राहील.