मंगळागौर पूजा: मंगळागौरची पूजा श्रावण महिन्याच्या पहिल्या मंगळवार पासून केली जाते. मंगळागौरची पूजा महाराष्टातील ब्राम्हण वर्गात केली जाते तसेच मराठा समाजता सुद्धा केली जाते. खर म्हणजे प्रत्येक प्रांतात त्याच्या पद्धतीने पूजा केली जाते. मंगळागौर म्हणजेच अन्नपूर्णा देवीची पूजा होय. मंगळागौरची पूजा २०१६ ह्या वर्षामध्ये ९, १६, २३ व 30 ऑगस्ट ह्या दिवशी आहे.
मंगळागौरची पूजा ही नवविवाहित मुलगी करते. लग्ना नंतर पहिली पाच वर्ष पूजा केली जाते. लग्नाझाल्यानंतर पहिला श्रावण महिना आला की पहिल्या मंगळवारी हे पूजा केली जाते. पहिल्या मंगळवारची पूजा खूप मोठ्या प्रमाणात व थाटामाटात केली जाते व ती मानाची समजली जाते. नंतर पाचव्या वर्षातील शेवटच्या मंगळवारी होणारी पूजा थाटामाटाने केली जाते. मंगळागौर पूजण्यासाठी नवीन लग्न झालेल्या मुली बोलवतात. ही पूजा करायचे कारणकी आपले सौभग्य अखंडपणे राहो. आपले घर समृद्ध राहो हा त्यामागचा हेतू आहे.
मंगळागौर पूजनासाठी सोळा प्रकारची पत्री, अनेक प्रकारची फुले, प्राजक्ताचा हार, गुलबक्षीच्या फुलांचा हार, पूजेचे साहित्य, चौरंग, देवीला फुलांचे हात करतात, वेणी बनवतात, काजळ तयार करतात, चोळीचा खण गुंफतात, तसेच लग्नाच्या वेळी गौरीहार पूजताना नवरी मुलीची आई आपल्या लाडक्या लेकीला अन्नपूर्णा देवी देते वती पुजायला सांगते त्यामुळे त्याच देवीची मुर्ती मंगळागौर पूजेसाठी घेतात.
मंगळागौर पूजण्याच्या दिवशी लवकर उठून घर झाडून पुसून, घरासमोर सडा रांगोळी काढून घ्यावी. पूजेकरिता अभ्यंगस्नान करून महावस्त्र नेसून अलंकार घालून नवीन लग्न झालेल्या मुली एकत्र येतात.
चौरंगावर देवीची स्थापना करून विधी पूर्वक पूजा करून देवीसाठी कणकेचे अलंकार बनवून ते वहातात व तेव्हा म्हणतात देवी तुला हे पीठाचे अलंकार व आम्हाला दे सोन्याचे अलंकार अशी मागणी करतात. मंगळागौरची आरती म्हणून पूजा झाल्यावर पुरणाचा महाप्रसाद नेवेद्य म्हणून दाखवतात.
संध्याकाळी हळदी कुकू करतात. रात्री देवीला पारिजातकाचे हार, गुलबक्षीचे हार घालून पूजा करतात. ह्या दिवशी रात्र जागवली जाते. गाणी, फुगडी, झिम्मा, फेर, सूप, पिंगा लाटणी हे पारंपारिक खेळ खेळले जातात. आजकाल नवीन पद्धत आहे की असे खेळ खेळणारे ग्रुप आहेत त्यांना बोलवले जाते त्यामुळे आजून खूप मजा येते. सगळी कडे मंगलमय वातावरण होते. मग पहाटे देवीची आरती होत मग मुली आपल्या घरी जातात.
आरती मंगळागौरिची
जय माये मंगळागौरी | तुजला पुंजू अंतरी | नाना विधी उपचारी | दीप ओवाळू सुंदरी ||जय.||
धृ.|| मंगळागौरी नाम तुझे | तुला नमन असो माझे | भवदुःखाचे हे ओझे | देवी उतरावे सहजे ||जय|| १||
गजाननाची तू माता | शंकराची प्रीयकांता | हिमाचलाची तुं दुहिता | मज तरी वो आता ||जय|| २ ||
आले वो तुझ्या चरणापाशी |जाळी पापांचीया राशी| भक्त ठसावी मानसी | अंबे न्यावे पायांपाशी ||जय||३||
गौरी ओवाळीते दीप | नेणे तुझे नाम रूप | वाढवावे सौभाग्य अमूप | विश्वाची तुं मायबाप ||जय || ४||
रिकामी ही खटपट | शुध्द मार्गी लावी नीट | परब्रम्ह घनदाट | द्यावी नारायणी भेट | जय माये मंगळागौरी | तुजला पुजूं अंतरी || ५ ||