नारळाचे पकोडे: नारळाचे विविध पदार्थ बनवता येतात. आता नारळी पौर्णिमा आहे त्यामुळे आपण नारळाचे काही गोड व काही तिखट पदार्थ बनवतो. नारळाचे पकोडे हे टेस्टी लागतात. पकोडे बनवतांना त्यामध्ये खोवलेला नारळ, कोथंबीर, हिरवी मिरची, कांदा व तांदळाचे पीठ वापरले आहे. तांदळ्याच्या पीठामुळे भजी छान कुरकुरीत होतात.
The English language version of this Pakora recipe and preparation method can be seen here- Coconut Pakode
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ छोटा नारळ (खोऊन)
२ मध्यम आकाराचे कांदे (चिरून)
१ छोटी कोथंबीर (जुडी)
५ हिरव्या मिरच्या (चिरून)
१” आले (बारीक चिरून)
१ कप तांदळाचे पीठ
१ टे स्पून बेसन
१ छोटे लिंबूरस
मीठ व साखर चवीने
तेल पकोडे तळण्यासाठी
कृती:
कोथंबीर धुऊन चिरून घ्या, कांदा-हिरवी मिरची-आले चिरून घ्या, नारळ खोऊन घ्या.
नारळ, कोथंबीर, कांदा, हिरवी मिरची, आले, मीठ, साखर, लिंबूरस, बेसन घालून मिक्स करून घ्या.
कढईमधे तेल गरम करून घ्या. गरम तेलामध्ये कपटे किंवा गोलाकार भजी घालून कुरकुरीत तळून घ्या.
गरम गरम पकोडे चटणीबरोबर किंवा टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.