शेवग्याचे सालन: शेवग्याचे सालन हे छान टेस्टी लागते. आपल्याला माहेत आहेच की शेवगा किती गुणकारी आहे. शेवगा हा चवीला थोडा गोड असतो. शेवगा हा वातरोग नाशक आहे. ज्यांना वाताचा त्रास होतो, सूज येते अश्या रुग्णासाठी शेवगाहा गुणकारी आहे. औषधी बनवतांना शेवग्याचा सुद्धा वापर केला जातो. तसेच शेवग्याच्या बिया डोळ्यांना हितावह आहेत. तर असा आहे गुणकारी शेवगा.
शेवग्याच्या सालना मध्ये कोलंबी अथवा सुके मासे घातले तर त्याची चव अप्रतीम लागते. अश्या प्रकारचे शेवग्याचे सालन सारस्वत लोकांमध्ये केले जाते.
The English language version of this Drumstick Vegetable Gravy recipe and preparation method can be seen here- Tasty Drumstick Gravy
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य:
४ मोठ्या शेवग्याच्या शेंगा
२ मोठे कांदे (चिरून),
४ मोठे टोमाटो
३ हिरव्या मिरच्या
१ टी स्पून आले-लसूण (जाडसर कुटून)
१ टी स्पून लाल मिरची पावडर मीठ चवीने
फोडणी करीता:
१ टी स्पून तूप,
१ टी स्पून जिरे
१० कडीपत्ता पाने
कृती:
शेवग्याच्या शेंगा धुवून, साले काढून कापून घ्या. टोमाटो उकडून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्या. कोथंबीर चिरून घ्या. हिरव्या मिरच्यांना चीर द्या.
कढईमधे तूप गरम करून त्यामध्ये जिरे, कांदा, कडीपत्ता, आल-लसूणपावडर, चीर दिलेल्या मिरच्या घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. मग त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा, लाल मिरची, मीठ, १ कप पाणी घालून कढईवर झाकण ठेवून मंद विस्तवावर शिजवून घ्या.
शेवगा शिजल्यावर टोमाटो प्युरी घालून मिक्स करून एक चांगली उकळी आणा.
गरम गरम शेवग्याचे सालन चपाती बरोबर किंवा पराठा बरोबर सर्व्ह करा.