मुगाच्या डाळीचा डोसा: मुगाच्या डाळीचा डोसा नाश्त्याला किंवा लहान मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला चांगला आहे. मुगाची डाळ ही आपल्या आरोग्याच्या द्रुष्टीने उत्तम आहे. मुगाची डाळ ही पचण्यासाठी हलकी आहे. मुगडाळ डोसा बनवतांना त्यामध्ये कांदा, कोथंबीर, तांदूळ वापरला आहे.
The English language version of the recipe and preparation method of this Dosa can be seen here- Green Gram Dosa
बनवण्यासाठी वेळ: ४० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२ कप मुगडाळ
१/२ कप तांदूळ
४-५ हिरव्या मिरच्या
२ मध्यम आकाराचे कांदे (बारीक चिरून)
१/४ कप नारळ (खोऊन)
१/२ कप कोथंबीर (चिरून)
१/४ टी स्पून हिंग,
मीठ (चवीने)
तेल डोसा भाजण्यासाठी
कृती: मुगडाळ व तांदूळ दोन तास वेगवेगळे भिजत ठेवा. कांदा व कोथंबीर बारीक चिरून घ्या. मुगडाळ, तांदूळ व हिरवी मिरची थोडी जाडसर वाटून घ्या. वाटलेल्या मिश्रणात कांदा, कोथंबीर, खोवलेला नारळ, मीठ, हिंग घालून मिश्रण एक सारखे करून घ्या. मिश्रण खूप पातळ करून नये.
नॉन स्टिक तवा गरम करून एक टी स्पून तेल तव्यावर लाऊन १/२ कप मिश्रण तव्यावर घालून एक सारखे पसरवून घ्या व कडेनी थोडेसे तेल घालून दोनीही बाजूनी गुलाबी रंगावर भाजून घ्या.
गरम गरम डोश्या बरोबर टोमाटो सॉस किंवा नारळाची हिरवी चटणी सर्व्ह करा.
See the same Dosa recipe using a different method and ingredients here – Sprouted Moong Dosa