टोमाटो-गाजर पुरी: टोमाटो-गाजर पुरी ही एक लहान मुलांना आवडणारी डीश आहे. लहानमुले पुरी आवडीने खातात. गाजर व टोमाटो हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहेत. ह्या पुऱ्या चवीला छान आंबटगोड लागतात. टोमाटो मुळे त्याला रंग पण चांगला येतो व त्या आकर्षक दिसतात. अश्या रंगीत पुऱ्या मुले आवडीने खातात. चाट मसला घातल्यामुळे चव पण निराळी येते.
The English language version of the recipe and preparation method of this Puri can be seen here- Tamatar-Carrot Puri
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: २० पुऱ्या
साहित्य:
२ कप गव्हाचे पीठ
२ मोठे टोमाटो
१ मोठे गाजर
२ टी स्पून लाल मिरची पावडर
१ १/२ टी स्पून चाट मसाला
१ टी स्पून साखर
२ टे स्पून तेल (गरम)
मीठ चवीने
तेल पुऱ्या तळण्यासाठी
कृती: टोमाटो धुऊन, उकडून, सोलून मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्या. गाजर धुवून किसून घ्या.
गव्हाचे पीठ, किसलेले गाजर, लाल मिरची पावडर, चाट मसाला, साखर, गरम तेल, मीठ घालून मिक्स करून घेवून त्यामध्ये टोमाटो प्युरी घालून पीठ घट्ट मळून घ्या. मळलेले पीठ २० मिनिट बाजूला ठेवून त्याचे एकसारखे २० गोळे बनवून घ्या.
एका कढाईमध्ये तेल चांगले गरम करून पुऱ्या छान क्रिस्पी होई परंत तळून घ्या.
गरम गरम पुऱ्या सर्व्ह करा.