भावनगरी गाठिया- शेव: भावनगरी शेव ही छान हलकी होते. ही शेव तिखट नसते . त्यामुळे लहान मुलांना फार आवडते. भावनगरी शेव बनवतांना हिरा बेसन वापरले आहे हे बेसन बाजारात उपल्ध आहे. भावनगरी गाठीया आपले दिवाळी फराळाचे ताट शोभिवंत करते महणून हा दिवाळीसाठी अगदी योग्य आहे.
The English language version of the recipe and preparation method of this Sev Recipe can be seen here – Bhavnagri Ghatiya
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ८-१० जणासाठी
साहित्य:
१/२ किलो बेसन (हतोडा छाप बेसन)
१ १/२ कप तेल
१ १/२ कप पाणी
१ टी स्पून मिरे व ओवा (जाडसर)
१ १/२ टी स्पून पापडखार
१ १/२ टी स्पून मीठ
तेल शेव तळण्यासाठी
कृती:
एका परातीत पाणी व तेल हातानी चांगले फेसून घ्या. मग त्यामध्ये कुटलेले मिरे व ओवा घालून मिक्स करा.
कढई गरम करून पापडखार व मीठ थोडेसे गरम करून घ्या. मग तेल पाणीच्या मिश्रणात मिक्स करून हळूवारपणे बेसन घालून मिक्स करून शेवेचे पीठ भिजवून घ्या.
कढईमधे तेल गरम करून घ्या. सोरयामध्ये शेवेचे पीठ भरून थोडी मोठी भोक असलेली चाकी वापरून गरम तेलामध्ये शेव घाला. शेव घालतांना वास्तव मोठा ठेवून मग शेव उलट करून विस्तव बारीक ठेवा. सोनेरी रंगावर शेव तळून घ्या. शेव तळलिकी पेपरवर ठेवा म्हणजे जास्तीचे तेल निघून जाईन. अश्या पकारे सर्व शेव बनवून घ्या.
शेव थंड झाल्यावर प्लास्टिकच्या पिशवीत भरून घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवा.