काळ्या मनुक्याची चटणी: काळ्या मनुक्याची चटणी ही छान आंबटगोड अशी लागते. काळे मनुकेहे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. मनुके हे गोड असतात त्यामुळे साखर घतली नाही. पुदिना वापरल्यामुळे चटणीला चांगला सुवास येतो.
The English language version of this Chutney and its preparation method can be seen here – Black Manuka Chutney
बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ कप काळे मनुके (बिया काढून)
२ टे स्पून काळे मनुके (बारीक चिरून)
१ टे स्पून लाल मिरची पावडर
१ टे स्पून जिरे पावडर
१० पुदिना पाने
२ टे स्पून गुळ
३ टे स्पून लिंबूरस
१ टी स्पून मीठ
कृती:
काळे मनुके धुऊन एक तास कोमट पाण्यात भिजत ठेवा.
मिक्सरमध्ये लाल मिरची पावडर, जिरे पावडर पुदिना पाने, गुळ, लिंबूरस, मीठ घालून चटणी वाटून घ्या. चटणी वाटुन झाली की मनुके घालून मिक्स करून अर्धा तास चटणी तशीच बाजूला ठेवा. मग सर्व्ह करा.