कापूर किंवा कपुर हा आपल्या परिचयाचा आहे. कापूर आपण नेहमी पूजे साठी वापरतो. पण पूजेच्या व्यतिरिक्त कापुरचे अनेक उपयोग आहे. तसेच आपल्या दैनंदिन जीवनात खूप उपयोगी सुद्धा आहे.
आपल्या शास्त्रा च्या मते आपण पूजेच्या वेळी कापूर लावलातर आपल्याला पुण्य लाभते असे म्हणतात. म्हणून रोज सकाळी व संद्याकाळी कापूर लावतात.
रोज कापुर लावल्यामुळे पितृदोष किंवा कालसर्प दोष चा प्रभाव कमी होतो. बरेच जण म्हणतात आम्हाला पितृदोष अथवा कालसर्पयोग आहे त्यामुळे आम्हला त्रास होतो पण तसे नसून राहू अथवा केतू च्या प्रभावा मुळे आपल्याला त्रास होत असतो. ह्याचा प्रभाव ठीक करायचा असेल तर आपली राहती वस्तू नीट करायला पाहिजे.
समजा आपली वास्तू आपण ठीक करू शकत नसाल तर एक सोपा साधा उयाय आहे तो म्हणजे रोज सकाळी, संध्याकाळी व रात्री तुपामध्ये भिजवलेला कापूर लावावा. तसेच घरातील स्नानगृहामध्ये २-२ कपूरच्या वड्या फक्त ठेवाव्यात.
कपूरचा अजून एक महत्वाचा उपयोग म्हणजे रात्री झोपताना हनुमान चालीसा वाचून झाल्यावर घरात कापूर लावावा म्हणजे आकस्मित घटना किंवा दुर्घटना ज्या राहू, केतू व शनीच्या पप्रभावाने होतात त्या होण्याच्या टळतात.
खर म्हणजे ज्या घरात रोज सकाळ-संध्याकाळी कापूर लावतात त्या घरात अश्या आकस्मित घटना अथवा दुर्घटना होत नाहीत. रात्री झोपण्याच्या आगोदर कापूर लाऊन मग झोपणे हे तर खूप लाभदायक आहे.
घरामधील नकारात्मक उर्जा नष्ट करायची असेल व शांती निर्माण करायची असेलतर रोज सकाळी व संद्याकाळी तुपात भिजवलेला कापूर लावावा त्याच्या सुवासाने नकारात्मक शक्ती जावून सुख-शांती येईल. तसेच घरामध्ये असलेले जीवाणू किंवा विषाणू जे रोग पसरवतात ते नष्ट होतात.
गुलाबाच्या फुलात एक कापूर ठेऊन संध्याकाळी लाऊन दुर्गा देवीच्या समोर ठेवावे म्हणजे आपल्याला अचानक धनप्राप्ती होते. पण हे नियमित ४३ दिवस नवरात्रीमध्ये करावे म्हणजे त्याचे फळ लवकर मिळते.
वास्तूदोष घालवायचा असेलतर एका बाजुला कपूरच्या दोन वड्या ठेवाव्यात जेव्हा त्या संपून जातील त्यानंतर परत दोन वड्या ठेवाव्यात असे करत रहावे म्हणजे वास्तू दोष निघून जाईन.
अजून एक छान उपाय आहे रोज आंघोळ करतांना आंघोळीच्या पाण्यात कापूर तेलाचे दोन थेंब घालायचे व त्याने आंघोळ करायची त्यामुळे आपल्याला ताजेतवाने वाटेल व हळू हळू आपले भाग्य सुद्धा चमकेल. तसेच चमेलीचे तेल वापरले तरी चालेल त्यामुळे राहू, केतू व शनीचा दोष रहात नाही. पण हे फक्त शनिवारी करावे.
रोज रात्री आपले स्वयंपाक घर आवरून झाले की चांदीच्या वाटीत कापूर व लवंग लावावे असे केल्याने आपल्याला धन -धान्य कधी कमी पडत नाही.
अजून एक चांगला उपाय आहे तो म्हणजे जर लग्न ठरण्यामध्ये बाधा येत असेलतर त्यासाठी एक उपाय आहे तो म्हणजे ३६ लवंग, ६ कापूर , हळद व तांदूळ मिक्स करून दुर्गामाताला अर्पण करावे.
कापूर रोज लावल्यामुळे घरातील वातावरण सुद्धा शांत रहाते.