हिरव्या मिरचीचा ठेचा- खर्डा: हिरव्या मिरचीचा खरडा ही एक अप्रतीम चटणी आहे. हा खरडा महाराष्ट्रात फार लोकप्रिय आहे. खास म्हणजे खानदेशात किंवा खेडेगावात पिठलं भाकरी व हिरव्या मिरचीचा खर्डा बनवतात.
ह्या मुळे तोंडाला छान चव येते. अगदी लवकर बनवता येणारा आहे.
The English language version of this Thecha recipe and preparation method can be seen here – Hirvya Mirchicha Thecha
बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट
वाढणी: २ जणासाठी
साहित्य:
१५ हिरव्या ताज्या मिरच्या
८ लसूण पाकळ्या
१ टे स्पून लिंबूरस
मीठ चवीने
१ टे स्पून पाणी
फोडणी करीता:
१ टी स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१/४ टी स्पून हिंग
कृती:
तवा गरम करून त्यावर १ टे स्पून पाणी घालून हिरव्या मिरच्या, लसूण घालून त्यावर स्टीलची प्लेट ठेऊन दोन मिनिट तसेच मंद विस्तवावर ठेवा.
प्लेट काढून मिरच्या सुक्या होई परंत शिजू द्या. मग मीठ, लिंबूरस व हिरव्या मिरच्या व लसूण काढून थोडे वाटुन घ्यावे व एका वाटी मध्ये काढून घ्यावे.
एका फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी व हिंग घालून, तडतडल्यावर शिजलेल्या मिरच्यांवर घाला. मिक्स करून भाकरी बरोबर सर्व्ह करा.