मेतकुट: मेतकुट हा महाराष्टात लोकप्रिय आहे. मेतकुट हा गरम गरम भात व साजूक तूप बरोबर सर्व्ह केला जातो. मेतकुट हा एक चटणीचाच प्रकार आहे. पण चवीला टेस्टी आहे. मेतकुट बनवतांना चणाडाळ, मसूरडाळ, गहू, उडीदडाळ, मुगडाळ, मेथ्या, सुंठ, वापरले आहे त्यामुळे तो पौस्टिक सुद्धा आहे. लहान मुले तूप,भात व मेतकुट आवडीने खातात.
The English language version of this Methkoot recipe and preparation method can be seen here – Methkoot
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ८-१० जणासाठी
साहित्य:
१ कप चणाडाळ
१/४ कप मसूरडाळ
१/४ कप गहू
१ टे स्पून उडीदडाळ
१ टे स्पून मुगडाळ
१” सुंठ तुकडा (सुके आले)
१ टी स्पून मेथ्या दाणे
१ टी स्पून मोहरी
१/४ टी स्पून हिंग
१० लाल सुक्या मिरच्या
१/२ टी स्पून हळद
मीठ चवीने
कृती:
हळद व मीठ सोडून बाकी सर्व साहित्य मंद विस्तवावर खमंग भाजून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटुन घ्या. मेतकुट वाटल्यावर त्यामध्ये मीठ व हळद मिक्स करा.