उपवासाचे साबुदाणा लाडू: साबुदाणा लाडू हे नवरात्रीत किंवा इतर उपसाच्या वेळी बनवू शकता . हे लाडू पौ स्टिक तर आहेतच तसेच चवीला पण चांगले लागतात. . साबुदाणा लाडू बनवतांना साबुदाणा फुलवलेला घेतला आहे. तसेच खसखस, शेगदाणे , सुका नारळ व गुळ वापरला आहे.
The English language version of this Sabudana Lodoo recipe and the preparation method can be seen here – Sabudana Ladoo for Fasting
बनवण्यासाठी वेळ: ४० मिनिट
वाढणी: ४ जण
साहित्य:
१ कप साबुदाणा (फुलवलेला)
२ टे स्पून खसखस
१ कप शेगदाणे
१ कप सुके खोबरे
१ १/२ कप गुळ
२ टे स्पून तूप
कृती:
साबुदाणा फुलवून घ्या. शेगदाणे भाजून, सोलून, जाडसर कुटून घ्या. खसखस थोडीशी भाजून घ्या. सुके खोबरे किसून भाजून घ्या. गुळ किसून घ्या.
एका बाऊलमध्ये साबुदा णा, शेगदाणे कुट, खसखस, सुके खोबरे मिक्स करून घ्या. एका कढईमधे किसलेला गुळ घालून थोडासा घट्ट सर पाक करून घ्या. मग त्यामध्ये तूप घालून मिक्स करून साबुदाणा चे मिश्रण घालून मिक्स करून मध्यम आकाराचे गोल लाडू बनवून घ्या.
लाडू वळवून झाल्यावर थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा.