बुंदीची खीर: बुंदीची खीर हा एक सणावाराला बनवण्यासाठी गोड पदार्थ आहे. आपण नारळाची, तांदळाची शेवयाची खीर बनवतो. बुंदीची खीर बनवून बघा खूप छान टेस्ट आहे. तसेच दिसायला पण आकर्षक दिसते. बुंदीची खीर ही आपण सुट्ट्या बुंदी पासून किंवा बुंदीच्या लाडू पासून सुद्धा बनवता येते. ही खीर बनवतांना दुध थोडे आटवून घेतले आहे. ह्या मध्ये दुध आटवताना साखर जरा कमीच वापरली आहे कारण बुंदी गोड आहे.
The English language version of this Kheer recipe and the preparation method can be seen here- Delicious Bundi Kheer
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ कप बुंदी
३ कप दुध
१/४ कप साखर
१ टे स्पून मिल्क पावडर
१ टी स्पून वेलचीपूड
२-३ बदाम
२-३ काजू
६-७ केशर काड्या
कृती:
दुध व साखर मिक्स करून दुध १० मिनिट उकळवून घ्या. मग त्यामध्ये मिल्क पावडर व वेलचीपूड मिक्स करून बुंदी मिक्स करून परत पाच मिनिट दुध उकळवून घ्या.
बुंदी खीर तयार झाली की एका काचेच्या बाऊलमध्ये ओतुन त्यावर काजू, बदामचे तुकडे घालून सजवा. मग फ्रीजमध्ये दोन तास थंड करायला ठेवा.
खीर थंड झाली की जेवणा नंतर डेझर्ट म्हणून सर्व्ह करा.