चुरमुरे लाडू: चुरमुरे लाडू हे चवीला छान लागतात. चुरमुरे हे पौस्टिक तर आहेच. लहान मुले तसेच मोठी माणसे सुद्धा आवडीने खातात. तसेच ते छान कुरकुरीत सुद्धा लागतात. असे लाडू बनवतांना चुरमुरे किंवा भडंग सुद्धा वापरले जातात. मी हे लाडू बनवतांना शेगदाणे व फुटाणाडाळ (पंढरपुरी डाळ) वापरली आहे. चिक्कीचा गुळ किंवा आपला नेहमीचा गुळ सुद्धा वापरता येतो. पण चिक्कीच्या गुळानी लाडू खमंग लागतात.
The English language version of this Puffed Rice Ladoo recipe and its preparation method can be seen here – Murmura Ladoo
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: २० मध्यम आकाराचे लाडू बनतात
साहित्य:
१ कप गुळ
३ कप चुरमुरे
१/४ कप शेगदाणे
१/४ कप पंढरपुरी डाळ
१ टी स्पून वेलची पूड
कृती:
शेगदाणे भाजून, सोलून छोटे-छोटे तुकडे करून घ्या,
एका कढईमधे गुळ गरम करून घ्या. गुळ विरघळला की त्यामध्ये वेलचीपूड घालून मिक्स करून त्यामध्ये शेगदाणे, पंढरपुरी डाळ घालून मिक्स करून चुरमुरे घाला व चांगले मिक्स करून घेऊन गरम असतांना त्याचे छोटे-छोटे लाडू बनवा.
चुरमुरे लाडू थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.