टोमाटो शेव: टोमाटो शेव ही चवीला छान आंबट तिखट अशी लागते. ही शेव बनवतांना टोमाटोची प्युरी वापरली आहे. टोमाटोमुळे शेवेला रंग सुद्धा छान येतो.
The English language version of this Sev recipe and the preparation method can be seen here – Spicy Tomato Sev
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: १०-१२ जणासाठी
साहित्य:
२ मोठे टोमाटो
४ कप बेसन
२ टी स्पून लाल मिरची पावडर
२ टे स्पून तेल (कडकडीत)
मीठ चवीने
तेल शेव तळण्यासाठी
कृती:
टोमाटो उकडून, सोलून मिक्सरमध्ये प्युरी बनवून घ्या, मग गाळून घ्या.
बेसन, लाल मिरची पावडर व मीठ चाळून घ्या. चाळलेल्या बेसनमध्ये कडकडीत तेल घालून मिक्स करून घ्या.मग त्यामध्ये टोमाटो प्युरी घालून मिक्स करून आवशक्यता असेलतसे पाणी वापरून पीठ मळून घ्या.
कढईमधे तेल गरम करून घ्या. सोरयामध्ये शेवेचे पीठ भरून लहान भोकाची चकती लावावी व गरम तेलात शेव घालावी. शेव घालतांना विस्तव मोठा ठेवा व शेव घातलीकी विस्तव कमी करावा. शेव सोनेरी रंगावर तळून घ्यावी. मग पेपरवर ठेवावी.
शेव थंड झाल्यावर भरून ठेवावी.