टोमाटो इडली: टोमाटो इडली हा एक नाश्त्याला किंवा मुलांना डब्यात द्यायला छान पदार्थ आहे. ही इडली बनवतांना कांदा, टोमाटो, बटाटा बारीक चिरून घातला आहे. तसेच मसाल्यासाठी आले-हिरवी मिरची-कोथंबीर वाटुन घालती आहे. जिरे पूड घातल्यामुळे चांगली चव येते. टोमाटो मसाला इडली सर्व्ह करतांना चटणी किंवा सांबरची जरुरत नाही. कारण ह्या इडलीमध्ये मसाला आहे. टोमाटो इडली दिसायला सुद्धा आकर्षक दिसते.
The English language version of this Idli recipe and its preparation method can be seen here – Tamatar Idli
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ३६ इडल्या बनतात
साहित्य:
इडलीचे पीठ बनवण्यासाठी:
२ कप साधे तांदूळ
१ कप उडीदडाळ
टोमाटो इडलीसाठी:
१ मोठ्या आकाराचा कांदा
१ मोठ्या आकाराचा टोमाटो
१ मध्यम आकाराचा बटाटा (सोलून)
१ टे स्पून आले-हिरवी मिरची पेस्ट
१/४ कप कोथंबीर (चिरून)
साखर व मीठ चवीने
एक चिमुट सोडा (खायचा)
तेल
कृती:
इडलीचे तयार करण्यासाठी तांदूळ व डाळ वेगवेगळी धुऊन ७-८ तास भिजत ठेवा. मग मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर वाटुन घेऊन हातानी एकसारखे करून परत ७-८ तास झाकून ठेवा म्हणजे इडलीचे मिश्रण चांगले फसफसून येईल.
कांदा, टोमाटो, बटाटा बारीक चिरून घ्या. आले-हिरवी मिरची-कोथंबीर वाटुन घ्या. जिरे थोडे गरम करून पूड करून घ्या.
इडलीच्या पिठात चिरलेला कांदा, टोमाटो, बटाटा, आले-हिरवी मिरची पेस्ट, जिरे पावडर, साखर-मीठ घालून मिक्स करून घ्या, मग त्यामध्ये एक चिमुट सोडा घालून मिक्स करा.
कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवा, इडलीच्या साचला तेल लाऊन त्यामध्ये मिश्रण घाला. कुकरचे झाकण लाऊन त्याची शिटी काढून १०-१२ मिनिट इडली वाफवून घ्या.
गरम गरम इडली लोण्या बरोबर सर्व्ह करा.