वरईची खीर: वरईची खीर ही उपासासाठी स्वीट डीश आहे. वरईची आपण खिचडी, भात, डोसे, थालीपीठ बनवतो. तसेच वरईची खीर ही एक छान डीश आहे. वरईही आरोग्याच्या दृष्टीने थंड आहे. खीर बनवतांना वरई चांगली निवडून घ्या कारण त्यामध्ये गाराचे खडे असतात किंवा नाचणी सुद्धा असते.
The English language language version of this Barn Yard Millet Kheer recipe and preparation method can be seen here – Vrat Ki Kheer
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ कप वरई
१/२ लिटर दुध
३/४ कप साखर
१ टे स्पून साजूक तूप
१ टी स्पून वेलचीपूड
थोडे ड्रायफ्रुट
कृती:
वरई धुवून स्वच्छ कापडावर 30 मिनिट वाळवत ठेवा.
कढई मध्ये तूप गरम करून त्यामध्ये धुऊन वाळवलेली वरई घाला व मंद विस्तवावर गुलाबी रंगावर भाजून घ्या.
दुसऱ्या एका भांड्यात दुध व साखर मिक्स करून उकळत ठेवा. दुध उकळलेकी त्यामध्ये भाजलेली वरई घालून मिक्स करून मंद विस्तवावर वरई शिजू द्या.
वरई शिजलीकी त्यामध्ये वेलचीपूड व ड्रायफ्रुट घालून मिक्स करून १०-२० मिनिट बाजूला ठेवा. मग वरईची खीर सर्व्ह करा.