पनीर टिक्का चिंगारी: पनीर हा असा पदार्थ आहे की तो सर्वांना आवडतो. पनीर पासून आपल्याला बरेच पदार्थ म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या सुद्धा बनवता येतात. पनीर चिंगारी ही एक चवीस्ट डीश आहे. पनीर चिंगारी बनवण्यासाठी कांदा, आले-लसूण पेस्ट, काजू पेस्ट, घालून परतून घेतली आहे. तसेच त्यामध्ये किसलेले पनीर घातले आहे त्यामुळे त्याची चव स्वादीस्ट लागते.
The English language version of this Paneer Tikka Masala recipe and its preparation method can be seen here – Chingari Paneer Tikka
बनवण्यासाठी वेळ: २५-30 मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२५० ग्राम पनीर
१ टी स्पून लिंबूरस
१/४ कप कोथंबीर (चिरून)
मीठ चवीने
मसाल्या करीता:
२ मोठे कांदे (किसून)
१ टे स्पून काजू पेस्ट
१ टी स्पून आले-लसूण पेस्ट
१ कप शिमला मिर्च (लाल, हिरवी, पिवळी)
१ टी स्पून गरम मसाला
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून हळद
फोडणे करीता:
१ टे स्पून तेल
४ मिरे
३ लवंग
२ तमलपत्र
कृती:
शिमला मिर्चचे १” आकाराचे तुकडे करून घ्या. पनीरचे १” आकाराचे तुकडे करून घ्या. त्यामधील २ पनीरचे तुकडे किसून घ्या. कांदा किसून घ्या. पनीरचे तुकडे तेलामध्ये थोडे परतून घ्या.
कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये मिरे, लवंग, तमलपत्र, आल-लसूण पेस्ट, हळद घालून 30 सेकंद परतून घेऊन किसलेला कांदा व चिरलेली शिमला मिर्च घालून ५ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या.
मग त्यामध्ये काजू पेस्ट, लाल मिरची पावडर, गरम मसाला, मीठ घालून किसलेले पनीर घालून एक मिनिट परतून घेऊन त्यामध्ये १/४ कप कोमट पाणी व पनीरचे तुकडे घालून एक चांगली उकळी येऊ द्या.
गरम गरम पनीर चिंगारी पराठा किंवा चपाती बरोबर सर्व्ह करा. सर्व्ह करतांना लिंबूरस व चिरलेली कोथंबीरने सजवा.