Kaju Hirve Matar Usal Recipe in Marathi

काजू हिरवे मटार उसळ: काजू मटारची उसळ ही चवीस्ट लागते. बनवायला सोपी व लवकर होणारी आहे. काजू मटार उसळ बनवतांना हिरवा मसाला वापरला आहे. मसाला बनवतांना कच्चे हिरवे टोमाटो वापरले आहेत त्यामुळे मसाल्याची चव छान आंबट-गोड अशी लागते. कोथंबीर व हिरव्या टोमाटोमुळे उसळीला हिरवा रंग येतो.

The English language version of this Maharashtrian Usal recipe and its preparation method can be seen here – Kaji-Matar Usal

बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: ४ जणासाठी

साहित्य:
१ कप काजू (पाकळी)
१ कप हिरवे ताजे मटार
मीठ व साखर चवीने

मसाल्या करीता:
१ कप कोथंबीर (चिरून)
४-५ हिरव्या मिरच्या
६ लसूण पाकळ्या
१ टी स्पून जिरे
२ मोठे हिरवे कच्चे टोमाटो

फोडणी करीता:
२ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१/४ टी स्पून हिंग

कृती:
पाकळी काजू एक तास पाण्यात भिजत ठेवा. हिरवे मटार उकडून घ्या.
कोथंबीर, लसूण, हिरवी मिरची, कच्चे टोमाटो, जिरे मिक्सरमध्ये बारीक वाटुन घ्या.
एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, घालून वाटलेला मसाला घालून ५-७ मिनिट मंद विस्तवावर भाजून घ्या. मग भाजलेल्या मसाल्यामध्ये काजू, मटार व एक कप पाणी घालून पाच मिनिट शिजवून घ्या.
काजू-मटर उसळ शिजल्यावर त्यामध्ये साखर व मीठ घालून मिक्स करून कोथंबीरीने सजवा.
गरम गरम काजू मटार उसळ पुरी बरोबर किंवा पराठा बरोबर सर्व्ह करा.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.