खमंग कडबोळी: खमंग कडबोळी ही दिवाळी फराळासाठी छान रेसिपी आहे. कडबोळी हा पदार्थ महाराष्ट्रात फार पूर्वी पासून लोकप्रिय आहे. कडबोळी ही भाजणीच्या पीठा पासून बनवली जाते. कडबोळी बनवतांना मी थालीपीठाचे पीठ वापरले आहे. थालीपीठाचे पीठ आपल्या घरात तयार असतेच व त्या पीठापासून कडबोळी छान चवीस्ट बनते. कडबोळीचे पीठ किंवा थालीपीठाचे भाजणीचे पीठ बनवतांना बाजरी, तांदूळ, हरभरा डाळ, ज्वारी, गहू, धने व काळे उडीद वापरले आहे त्यामुळे कडबोळी किंवा थालीपीठ हे पौस्टिक आहेच.
The English language version of this Diwali Faral Snack recipe and its preparation method can be seen here – Crispy Kadboli
कडबोळी भाजणी बनवण्यासाठी:
भाजणी बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
साधारणपणे २ किलोग्राम भाजणी बनते.
साहित्य:
१/२ किलोग्राम (४ कप) बाजरी
१/४ किलोग्राम (२ कप) तांदूळ
१/४ किलोग्राम (२ कप) हरभरा डाळ
१/४ किलोग्राम (२ कप) ज्वारी
१/४ किलोग्राम (२ कप) गहू
१२५ किलोग्राम (१ कप) काळे उडीद
१२५ किलोग्राम (१कप) धने
कृती: बाजरी, तांदूळ, हरभरा डाळ, ज्वारी, गहू, उडीद व धने हे सर्व न धुता मंद विस्तवावर गुलाबी रंगावर भाजून घ्या. थंड झाल्यावर थोडेसे जाडसर दळून आणा.
कडबोळी भाजणी बनवतांना काही गोष्टी लक्षात घ्या.
सर्व धान्ये मंद विस्तवावर भाजून घ्या.
भाजणी थोडी जाडसर दळून आणावी म्हणजे थालपीठ छान खमंग होतात.
दळून आणलेली भाजणी प्लास्टिक पिशवीत घट्ट बांधून ठेवावी. म्हणजे ५-६ महिने टिकते.
कडबोळी बनवण्यासाठी साहित्य:
कडबोळी बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ३०-३५ कडबोळी बनते
२ कप थालीपीठ भाजणी
२ टी स्पून लाल मिरची पावडर
२ टी स्पून मीठ
२ टे स्पून तीळ
१ टी स्पून ओवा
१/४ कप तेल (कडकडीत म्हणजे मोहन)
१ कप पाणी (गरम)
तेल कडबोळी तळण्यासाठी
कृती:
थालीपीठ भाजणी, लाल मिरची पावडर, मीठ, तीळ, ओवा, घालून मिक्स करून त्यामध्ये तेलाचे गरम मोहन घालून मिक्स करून घेऊन मग १ कप गरम उकळते पाणी घालून मिक्स करून पीठ झाकून एक तास झाकून ठेवा.
एका तासाने भाजणी पाण्याच्या हात लाऊन खूप मळून घ्यावी. मग एक सारखे छोटे गोळे बनवा. पोलपाटावर एक गोळा घेऊन हाताने लांब वाती सारखी लांब नळी बनवून वळवून दोनी टोके जोडून दाबावी.
कढईमधे तेल गरम करून घेऊन घ्या. एका वेळेस १०-१२ कडबोळी तेलामध्ये घालून मंद विस्तवावर काळपट रंगावर तळून घ्या. अश्या प्रकारे सर्व कडबोळी बनवून तळून घ्या. थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.
कडबोळी बनवतांना काही गोष्टी लक्षात घ्या.
कडबोळी भाजणी शक्यतो फार जुनी वापरू नये.
कडबोळी वळताना पातळ वळावी म्हणजे तळताना आतमध्ये कच्ची रहात नाही व छान खुसखुशीत होते.