खारी चंपाकळी: खारी चंपाकळी ही दिवाळी फराळासाठी एक छान डीश आहे. चंपाकळी बनवतांना मैदा, मिरे, ओवा, बेकिंग पावडर वापरली आहे. त्यामुळे चंपाकळी छान कुरकुरीत होते. दिवाळी फराळाला किंवा नाश्त्याला बनवता येत्तात. चंपाकळी बनवतांना गोल पुरी लाटून पुरीला मध्यभागी सुरीने उभ्या चिरा मारून पुरी मुडपून घेऊन दोन्ही कडा दाबून घ्या. तसेच तळताना ३/४ चंपाकळी तेलात सोडून हातानी थोडी हलवा म्हणजे तिचा आकार छान येईल.
The Marathi language video Crispy Chatpati Khari Champakali For Diwali Faral can be seen on our YouTube Channel: Crispy Chatpati Khari Champakali For Diwali Faral
The English language version of the Champakali recipe and preparation method can be seen here – Maharashtrian Style Champakali
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: २० बनतात
साहित्य:
२ कप मैदा
२ टी स्पून मिरे (जाडसर वाटून)
१ टी स्पून ओवा (जाडसर वाटुन)
१ टे स्पून तेल (गरम म्हणजेच मोहन)
एक चिमुट बेकिंग पावडर
१ टी स्पून मीठ
तेल चंपाकळी तळण्यासाठी
कृती:
मैदा व मीठ चाळून घ्या. मिरे, ओवा जाडसर कुटून घ्या. मोहन गरम करून घ्या.
एका परातीत चाळलेला मैदा, कुटलेले मिरे-ओवा, गरम कडकडीत मोहन घालून मिक्स करून मग बेकिंग पावडर घालून मिक्स करून घ्या. पाणी वापरून पीठ घट्ट मळून घ्या. मग पीठाचे लिंबा एव्ह्डे गोळे बनवा. एक गोळा घेऊन पुरी एव्ह्डा लाटून घ्या. पुरीच्या मध्ये उभ्या चिरा मारा, पण कडेला पुरी तुटता कामा नये. चिरा मारल्यावर पुरी गुंडाळून कडेला दोनी बाजूनी दाबून घ्या.
कढईमधे तेल गरम करून घ्या. एक चंपाकळी घेऊन ३/४ चंपाकली गरम तेलात सोडून हातानी हलवा म्हणजे ती थोडी उलघडेल व छान आकार येईल. सुरवातीला विस्तव मोठा ठेवावा मग चंपाकळी तेलात सोडल्यावर विस्तव मंद करून छान कुरकुरीत तळून घ्या. अश्या प्रकारे सर्व चंपाकळी बनवून घ्या.
चंपाकली थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा.