कुरकुरीत- तिखट खरी शंकरपाळी: खारे शंकरपाळे हे दिवाळी फराळमध्ये बनवण्यास छान आहेत. आपण नेहमी गोड शंकरपाळे बनवतो त्याच्या जोडीला खारी शंकरपाळी बनवून बघा चवीला खूप छान लागतात. खारी शंकर पाळी ही महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. ही शंकरपाळी बनवायला सोपी आहे.
The English language version of the recipe and preparation method of this Shankarpali variation can be seen here – Tikhat Shankarpali
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: १०-१२ जणासाठी
साहित्य:
४ कप मैदा
८ टे स्पून तेल (गरम)
१ टी स्पून मिरे पावडर (जाडसर)
१ टी स्पून जिरे (जाडसर कुटून)
१/२ टी स्पून ओवा (जाडसर कुटून)
मीठ चवीने तेल शंकरपाळे तळण्यासाठी
कृती:
एका परातीत मैदा व मीठ चालून घ्या. मिरे, जिरे, ओवा जाडसर कुटून घ्या. मग मैद्या मध्ये मिरे-जिरे-ओवा पावडर व कडकडीत तेल मिक्स करून घेऊन पाणी वापरून घट्ट पीठ मळून घेऊन एक तास तसेच बाजूला ठेवा.
पीठाचे एक सारखे ४ गोळे बनवा. एक गोळा घेऊन पोळी सारखा लाटून घ्या. लाटलेल्या पोळीच्या शंकरपाळे कापून घ्या. कापलेल्या शंकरपाळ्या एका पेपरवर पसरवून ठेवा. अश्या प्रकारे सर्व शंकरपाळे बनवून घ्या.
एका कढईमधे तेल गरम करून घ्या. शंकरपाळे तळताना प्रथम विस्तव मोठा ठेवा. शंकरपाळे तेलात घातल्यावर विस्तव मंद करा. छान कुरकुरीत शंकरपाळे तळून घ्या.
तळलेले शंकरपाळे चाळणीवर पेपर ठेवून त्यावर ठेवा. तळलेले शंकरपाळे थंड झाल्यावर प्लास्टिक पिशवीत भरून घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवा.