पुदिना चटणीके आलू: पुदिना चटणीके आलू किंवा पुदिना चटणी मधील छोटे बटाटे ही एक जेवणातील छान चवीस्ट भाजी आहे. छोट्या बटाट्याचे अनेक प्रकारच्या भाज्या बनवता येतात. त्यातील ही एक छान पुदिना वापरून बनवलेली भाजी आहे. ही भाजी बनवतात हिरवा मसाला, लवंग, दालचीनी, वेलची, चाट मसाला वापरला आहे. ह्या भाजी मध्ये पुदिना वापरला आहे त्यामुळे छान टेस्ट येते.
The English language version of this Fried Baby Potatoes recipe and preparation method can be seen here – Aloo in Pudina Chutney
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१५ बेबी बटाटे
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून चाट मसाला
मीठ चवीने
मसाल्या करीता:
१ कप कोथंबीर (चिरून)
१/२ कप पुदिना पाने
२ हिरव्या मिरच्या
६-७ लसूण पाकळ्या
१” आले तुकडा
४ लवंग
१/२” दालचीनी तुकडा
४ वेलदोडे
१ टी स्पून अनारदाना
फोडणी करीता:
२ टे स्पून तेल
१/४ टी स्पून हिंग
कृती:
छोटे बटाटे उकडून, सोलून घ्या. कोथंबीर, पुदिना, आले-लसूण-हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक वाटुन घ्या. लवंग, दालचीनी, वेलचीची बारीक पूड करून घ्या.
एका कढईमधे तेल गरम करून उकडलेले बटाटे गुलाबी रंगावर तळून घ्या. मग त्यामध्ये हिंग, वाटलेला हिरवा मसाला, लवंग-दालचीनी पावडर, चाट मसाला, मीठ, लाल मिरची पावडर, घालून अर्धा कप पाणी घालून एक उकळी आणा.
गरम गरम पुदिना आलू पराठा बरोबर किंवा चपाती बरोबर सर्व्ह करा. सर्व्ह करतांना कोथंबीर घालून सर्व्ह करा.