वजन कमी करायचे का? मग काय करायला हवे त्याचे काही स्मार्ट सोप्या टिप्स.
सकाळी नाश्याला किंवा न्याहरीला ज्वारी, मका अथवा राजगीरा लाह्या गाईच्या दुधामध्ये घालून घ्याव्यात. त्यामुळे पोट सुद्धा भरते व नाश्ता सुद्धा होतो. मधून मधून रव्याचा उपमा सुद्धा करता येतो किंवा राजगीराच्या लाह्यांचा सुद्धा उपमा करता येते हा उपमा चवीस्ट लागतो. हा उपमा बनवायला सोपा, पचण्यास हलका व हेल्दी सुद्धा आहे.
बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट
वाढणी: १ जणासाठी
साहित्य:
१ कप राजगीऱ्याच्या लाह्या
१/४ कप पाणी (किंवा अजून लागलेतर घ्यावे)
१/४ टी स्पून लिंबूरस
मीठ व साखर चवीने
२ टे स्पून कोथंबीर (चिरून)
फोडणी करीता:
१ टी स्पून तेल
१/२ टी स्पून मोहरी
१/२ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
५ कडीपत्ता पाने
१/४ टी स्पून हळद
साहित्य:
एका कढईमधे तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, कडीपत्ता, हळद घालून मग राजगीऱ्याच्या लाह्या घालून दोन मिनिट परतून घेऊन त्यामध्ये कोमट पाणी घालून मिक्स करून मीठ, लिंबूरस, साखर, कोथंबीर घालून मिक्स करून एक दणदणीत वाफ येऊ द्यावी.
गरम गरम उपमा सर्व्ह करावा.
खालील गोष्टी लक्षात ठेवल्यात तर नक्की फायदा होयील
नाश्ता झाल्यावर दुपारच्या जेवणात चपाती आयवजी ज्वारीची, बाजरीची, तांदळाची किंवा नाचणीची भाकरी बनवावी. ह्या भाक्रीमुळे पोट सुद्धा भरते. वजन वाढत नाही. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी जेवणात भाकरी आवश्क ख्वावी. ज्वारी, बाजरी, तांदूळ हे तंतुमय पदार्थ आहेत. भाकरी बरोबर पालेभाजी किंवा फळभाजी घ्यावी. तेल तुपाचा कमी वापर करावा शक्यतो नॉन स्टिक भांडी वापरावीत म्हणजे तेल कमी लागते.
वजन कमी करायचे असेलतर सूप तर हवेच. सूप हे आपण घरच्या घरी झटपट व ताजे बनऊ शकतो, तसेच सलाड हे वजन कमी करायला चांगले आहे. आपण घरी टोमाटो सूप, मक्याचे सूप, बीटचे सूप, भाज्यांचे सूप बनऊ शकतो त्याने पोट सुद्धा भरते. बाहेरील विकतची महागडी सूप आणून घेण्या पेक्षा घरच्या घरी सूप बनवता येतील.
सलाड मध्ये आपण, कांदा, काकडी, गाजर, बीट, मुळा तसेच कोबी वापरून सलाड बनवू शकतो. सलाड हे पौस्टिक तर आहेच तसेच चवीस्ट सुद्धा लागते. सलाड मधून आपल्या शरीराला जे अन्न घटक लागतात ते मिळतात.
ताक हे वजन कमी करायला उपयोगी आहे. ताक हे साईचे नको. साय काढून बनवलेले असावे. ताक हे दुपारी जेवणामध्ये घ्यावे.
एकदा वजन कमी करायचे ठरवलेतर आपल्या खाण्याच्या सवयीचा एक तक्ता बनवावा व तक्त्याप्रमाणे आपला आहार ठरवून घ्यावा. बनवलेल्या तक्तानुसार वजन कमी केले जाते पण वजन कमी झाले की लगेच आपल्या सवईमधे बदल करू नये.
जर तुम्हाला स्मार्ट दिसायचे असेलतर खाली देलेल्या गोष्टी लक्षात ठेवा. खाली दिलेल्या टिप्स घरगुती वापर करून वजन कमी करण्यासाठी आहेत.
पूर्ण दुध घेण्याआयवजी साय काढून दुध घ्यावे.
दुधा आयवजी ताक घ्यावे.
प्रक्रिया केलेल्या धान्या आयवजी कोंड्यासकटचे पूर्ण धान्य वापरावे.
मधल्या वेळेचे खाणे व पक्वान्न आयवजी फळे खावीत.
सलाड खावीत.
मिल्कशेक अथवा सोडा घेण्याच्या आयवजी लिंबूपाणी घ्यावे.
अंडे पूर्ण घेण्या आयवजी फक्त अंड्यातील पांढरा भाग घ्यावा.
मटन, चिकन व अंड्या आयवजी ताजे मासे घ्यावेत.
तळलेले मसालेदार पदार्था आयवजी उकडलेले अथवा वाफवलेले पदार्थ घ्यावेत.
हंगामी फळे अथवा मोड आलेली कडधान्ये घ्यावीत.
गव्हाची पोळी व भाता आयवजी भाकरी घ्यावी.
जेवण झाल्याबरोबर पाणी पिऊ नका जरा वेळाने पाणी प्या.दिवसाला ७-८ ग्लास पाणी प्या.
वेळच्या वेळी जेवण घ्या. फार उशीरा जेवण करू नका.
रोज चालण्याचा व्यायाम करा. ह्या गोष्टी रोज कटाक्षाने पाळल्या तर नक्की फायदा होईल.