शिंगाड्याच्या पिठाचा हलवा: शिंगाड्याच्या पिठाचा हलवा ही एक उपासाची छान स्वीट डीश आहे. नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास असतात. तेव्हा तिखट पदार्था बरोबर गोड पदार्थ सुद्धा पाहिजे त्यासाठी शिंगाड्याच्या पिठाचा हलवा बनवायला छान आहे. हा हलवा चवीला खमंग लागतो. झटपट बनतो व बनवायला सोपा पण आहे.
The English language version of this Upvas Shingada Sheera recipe and its preparation method can be seen here – Water Chestnuts Sheera
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: २ जण
साहित्य:
१ कप शिंगाड्याचे पीठ
१ कप साखर
१ १/४ कप दुध
२ टे स्पून तूप
१ टी स्पून वेलचीपूड

कृती:
१ टे स्पून तूप गरम करून त्यामध्ये शिंगाड्याचे पीठ घालून मिक्स करून ५-७ मिनिट मंद विस्तवावर भाजून घ्या. मग त्यामध्ये गरम दुध हळू हळू घालून मिक्स करत रहा, पूर्ण दुध घालून झाल्यावर ५ मिनिट मंद विस्तवावर शिजू द्या. नंतर त्यामध्ये साखर, वेलचीपूड व एक टे स्पून तूप घालून मिक्स करून घ्या. हलवा थोडा घट्ट होईस्तोवर मंद विस्तवावर ठेवा.
गरम गरम हलवा सर्व्ह करा.