Tasty Chole Bhature Recipe in Marathi

Maharashtrian Chole Bhature
Tasty Chole Bhature

छोले भटुरे: छोले भटुरे ही पंजाबी लोकांची लोकप्रिय डीश आहे पण आता ती सर्वत्र लोकप्रिय झाली आहे. छोले भटुरे हे आपण नाश्त्याला किंवा जेवणामध्ये, मुलांच्या पार्टीला सुद्धा बनवू शकतो. छोले हे काबुली चण्याचे बनवतात व भटुरे हे मैदा व दही वापरून बनवतात. घरी कोणी पाहुणे येणार असतील तर त्यासाठी सुद्धा ही डीश छान आहे. घरच्या घरी हॉटेलमध्ये बनवतात तसे छोले-भटुरे बनवता येतात.

The English language version of this Indian Fast-Food recipe and its preparation method can be seen here – Fast-Food Stall Style Chole Bhature

बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी

साहित्य:
१/४ किलो ग्राम कबुलीचणे (२५० ग्राम)
१ मोठा कांदा (बारीक चिरून)
१ मोठा टोमाटो (बारेक चिरून)
१/२ टी स्पून हळद
१ टी स्पून छोले मसाला
२ चिमुट बेकिंग सोडा
२ टे स्पून चिंचेचा कोळ
२ टे स्पून तेल मीठ चवीने
१/४ कप कोथंबीर (चिरून)

मसाल्या करीता:
१ टे स्पून तेल
१ मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
१/२ कप ओला नारळ
७-८ लसूण पाकळ्या
१/२” आले तुकडा
१ १/२ लाल मिरची पावडर

कृती:
पहिल्यांदा छोले ७-८ तास भिजत ठेवा. (आधल्या रात्री) मग कुकुरमध्ये छोले, थोडे पाणी व दोन चिमुट सोडा घालून कुकरला ४-५ शिट्या काढून घ्या. सोडा घातल्यामुळे छोले छान मऊ शिजतात.
कांदा, टोमाटो बारीक चिरून घ्या. आले-लसूण चिरून घ्या.

मसाल्या करीता:
कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा, आले-लसूण घालून थोडा फ्राय करा. मग त्यामध्ये खोवलेला नारळ घालून थोडा परतून घेऊन लाल मिरची पावडर घाला व मिक्स करून मिक्सर मध्ये बारीक वाटुन घ्या.

छोले बनवण्याकरीता:
एका कढईमधे तेल गरम करून घेऊन त्यामध्ये कांदा, टोमाटो घालून थोडे परतून घ्या. मग त्यामध्ये हळद, मीठ व उकडलेले छोले, छोले मसाला, चिंचेचाकोळ, वाटलेला मसाला, १ कप पाणी घालून मिक्स करून घेऊन १०-१५ मिनिटे मंद विस्तवावर चांगली उकळी आणा.
भटुरे: भटुरे म्हणजे छोले बरोबर सर्व्ह करण्यासाठी पुरी

साहित्य:
३ कप मैदा
२ टे स्पून तेल (कडकडीत मोहन)
१/४ टी स्पून हळद
१ टे स्पून दही
मीठ चवीने
कोमट पाणी पीठ भिजवण्यासाठी
तेल भटुरे तळण्यासाठी

Maharashtrian Chole Bhature
Tasty Chole Bhature

कृती:
एका मोठ्या आकारच्या बाऊलमध्ये मैदा, दही, गरम तेल, मीठ व हळद मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये कोमट पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्या. मळलेले पीठ ओल्या कापडामध्ये पीठ गुंडाळून ४-५ तास बाजूला ठेवा. मग पीठाचे एक सारखे आठ गोळे बनवा.

कढईमधे तेल गरम करायला ठेवा. तेल चांगले गरम झाले की एक एक गोळा घेऊन पुरी सारखा लाटून घ्या मग गरम तेलात सोडून तळून घ्या. अश्या प्रकारे सर्व भटुरे बनवून घ्या.

सर्व्ह करतांना बाऊलमध्ये शिजवलेले छोले घेऊन त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमाटो व कोथंबीरने सजवा व गरम गरम भटुरे बरोबर सर्व्ह करा.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.