Tasty Idli Sandwich Recipe in Marathi

Idli Sandwich
Tasty Idli Sandwich

इडली सॅन्डविच: इडली सॅन्डविच ही एक नाश्त्याला किंवा मुलांना डब्यासाठी द्यायला छान व पौस्टिक पदार्थ आहे. इडली सॅन्डविच बनवतांना प्रथम नेहमी प्रमाणे इडली बनवली आहे मग त्यामध्ये नारळाची चटणी, टोमाटोची चकती, काकडीची चकती, चीज किसून किंवा त्याचा पातळ पीस घालून बनवले आहे. इडली सॅन्डविच ही एक चवीस्ट डीश आहे ह्यामध्ये मसाला वापरलेला नाही त्यामुळे हे चवीला चांगले लागते.

The English language version of this Tasty and Delicious Idli Sandwich recipe and preparation method can be seen here – Fresh Idli Sandwich

बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट
वाढणी: ६-७ जणासाठी

इडली बनवण्यासाठी साहित्य:
२ कप साधा तांदूळ किंवा उकड्या तांदूळ
१ कप उडीदडाळ
१/४ कप इडली रवा
२ टेस्पून तिळाचे तेल
मीठ चवीने
तेल इडली बनवण्यासाठी

चटणी करीता:
१ कप ओला नारळ
१/४ कप कोथंबीर (चिरून)
१/४ कप पुदिना पाने (चिरून)
७-८ लसून पाकळ्या
३ हिरव्या मिरच्या
१ टी स्पून लिंबूरस
१/२ टी स्पून साखर
मीठ चवीने
३ मध्यम आकाराचे टोमाटो
२ मध्यम आकाराच्या काकड्या
३ चीज क्यूब (किसून किंवा पातळ स्लाईस करून)

 Idli Sandwich
Tasty Idli Sandwich

कृती:
इडली बनवण्यासाठी: तांदूळ व तुरडाळ धुऊन वेगवेगळी ७-८ तास पाण्यात भिजत ठेवा. नंतर जास्तीचे पाणी काढून मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर वाटुन घ्या.
तांदूळ व डाळ वाटुन झाल्यावर इडलीचा रवा घालून चांगले मिक्स करून परत ७-८ तास तसेच झाकून ठेवा.
इडली बनवण्याच्या वेळी त्यामध्ये मीठ व तिळाचे तेल मिक्स करा. इडलीचे मिश्रण खूप पातळ किंवा घट्ट नसावे. जाऊन पडल्यास थोडेसे पाणी वापरा.
कुकरमध्ये किंवा इडली पात्रात पाणी गरम करायला ठेवा. इडलीच्या साचाला तेलाचा हात लाऊन इडलीचे मिश्रण डावाने घाला. कुकरची शिट्टी काढून झाकण लावा व १५ मिनिट इडलीला वाफवून घ्या. मग इडली काढून घ्या.
चटणी करीता:
खोवलेला नारळ, कोथंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या, लसूण, लिंबूरस, साखर, मीठ १/४ कप पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
इडली थंड झाल्यावर इडलीला मध्ये चीर देऊन त्याचे दोन भाग करा. दोनी भागाला आतल्या बाजूला चटणी लाऊन एका भागावर टोमाटोची चकती, काकडीची चकती, चीज ठेवून इडलीचा दुसरा भाग त्यावर ठेवा. अश्या प्रकारे सर्व इडली सॅन्डविच बनवुन घ्या. मग सर्व्ह करा.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.