सुरळीच्या वड्या: सुरळीच्या वड्या ही एक महाराष्ट्रातील जुन्याकाळातील लोकप्रिय डीश आहे. सुरळीच्या वड्यांना गुजरातमध्ये खांडवी म्हणून लोकप्रिय आहे. ह्या वड्या बनवण्यासाठी सोप्या आहेत पण बनवायला थोडा वेळ लागतो. सुरळीच्या वड्याची टेस्ट अगदी अप्रतीम लागते. ह्या वड्या साईड डीश म्हणून बनवता येतात. खांडवी किंवा सुरळीच्या वड्या बनवतांना बेसन, नारळ, कोथंबीर व फोडणीचे साहित्य वापरले आहे. ह्या वड्या लग्नाच्या मेनूमध्ये किंवा पार्टीला तसेच इतर दिवशी सुद्धा बनवता येतात.
The English language version of the making of this Suralichi Vadi/Khandvi can be seen here – Traditional Suralichi Vadi
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ कप बेसन (चणाडाळ पीठ)
१ टी स्पून मैदा
३/४ कप ताक
२ कप पाणी
१ टे स्पून आले-हिरवी मिरची पेस्ट
१/२ टी स्पून हळद
मीठ चवीने
१/४ कप कोथंबीर
१/४ कप नारळ (खोऊन)
४ मोठी ताटे
फोडणीसाठी:
२ टे स्पून तेल
२ टी स्पून मोहरी
२ टी स्पून जिरे
१/२ टी स्पून हिंग
१०-१२ कडीपत्ता
कृती:
बेसन, मैदा, आले-हिरवी मिरची पेस्ट, हळद, मीठ, ताक, २ कप पाणी घालून चांगले मिक्स करून घेऊन गाळून घ्या. गाळून घेतल्यामुळे ताकाचा चोथा, आले-मिरची पेस्ट मधील थोडे काही जाड राहिले असेलतर गाळले जाईल. त्यामुळे वड्या छान पातळ होतात.
एका छोट्या कढईमधे तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, कडीपत्ता घालून तडतडले की फोडणी खाली उतरवून ठेवा.
एका मध्यम आकारच्या कढईमधे बेसनाचे मिक्शर मंद विस्तवावर शिजवायला ठेवा. मिश्रण घट्ट व्हायला आले की कढईवर झाकण ठेवून एक चांगली वाफ येऊ द्या. मिश्रणाचे एक सारखे चार भाग करा.
चार मोठी ताटे घेऊन प्रत्येक ताटावर शिजवलेल्या मिश्रणाचा एक भाग घेऊन ताटावर डावाने डोश्या सारखा पसरवावा. मिश्रण पसरवताना अगदी पातळ पसरवले पाहिजे.
ताटावर मिश्रण पसरवून झाल्यावर त्यावर १ टी स्पून तयार केलेली फोडणी व थोडेसे ओले खोबरे व कोथंबीर पसरवून घ्या. मग १” चे रिबीन सारखे कापून घ्या. मग हाताने हळुवारपणे गोल गुंडाळत जा. अश्या प्रकारे ताटातील सर्व वड्या बनवून घ्या. बनवलेल्या वड्या एका बाऊलमध्ये काढून ठेवा.
बाऊलमध्ये काढून ठेवलेल्या वड्यावर राहिलेली फोडणी घालून कोथंबीर व खोवलेल्या नारळाने सजवा.