चिकन नुडल राईस बिर्याणी: चिकन नुडल राईस बिर्याणी ही एक अप्रतीम जेवणातील डीश आहे. नुडल्स तर लहान मुलांना खूप आवडतात. तसेच चिकन सुद्धा आवडते. चिकन नुडल राईस बिर्याणी बनवतांना चिकन, वेगवेगळ्या भाज्या, नुडल्स व भात सुद्धा वापरला आहे. अश्या प्रकारची बिर्याणी पोस्टीक आहे. कारण भाज्या व चिकन आहे. ही बिर्याणी बनवायला सोपी आहे. ह्या मध्ये प्रथम चिकन मँरीनेट करून घेऊन मग शिजवून घेतले आहे व शिजवताना त्यामध्ये थोड्या कच्या नुडल घातल्या आहेत त्यामुळे खूप छान वेगळी टेस्ट येते. भात व नुडल पण वेगवेगळ्या बनवून घेतल्या व भात तयार झाल्यावर भाज्या घालून फ्राय करून घेतला.
This English language version of the same Chicken Biryani recipe and its preparation method can be seen here – Chicken Rice-Noodles Biryani
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
चिकन मँरीनेट करण्यासाठी:
८-१० चिकन पिसेस
१ कप कोथंबीर (चिरून)
१” आले तुकडा
१५-२० लसूण पाकळ्या
३ हिरव्या मिरच्या
२ टी स्पून लाल मिरची पावडर
१/२ कप दही
१/२ टी स्पून हळद
१ टी स्पून गरम मसाला
१ टी स्पून तंदुरी चिकन मसाला
मीठ चवीने
१ टे स्पून तेल
१ मोठा कांदा
१ छोटा टोमाटो
भात बनवण्यासाठी:
२ कप बासमती तांदूळ
१ मध्यम आकाराचा कांदा
१ छोटी शिमला मिर्च
१ छोटे गाजर मीठ चवीने
१ टे स्पून तेल
४-५ मिरे
१/२ टी स्पून शहाजिरे
२ तमालपत्र
१/२” दालचीनी तुकडा
नुडल्स बनवण्यासाठी:
नुडल पाकीट (१५० ग्राम)
१ टी स्पून तेल
मीठ चवीने
सजावटीसाठी:
१ मध्यम आकाराचा कांदा (चकत्या)
तळलेले काजू
कृती:
कोथंबीर, आले-लसूण-हिरवी मिरची मिक्सरमध्ये वाटुन घ्या. कांदा उभा पातळ चिरून घ्या. टोमाटो शिमला मिर्च, गाजर, घेवडा उभा चिरून घ्या. तांदूळ धुवून बाजूला ठेवा.
चिकन मँरीनेट: चिकनचे तुकडे धऊन त्याला वाटलेला हिरवा मसाला, लाल मिरची पावडर, गरम मसाला, तंदुरी मसाला, हळद, टोमाटो, दही, मीठ घालून मिक्स करून २ तास बाजूला ठेवा.
कढईमधे तेल गरम करून घेऊन त्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालून २-३ मिनिट मंद विस्तवावर परतून घेऊन त्यामध्ये चिकन, घालून मिक्स करून, कढईवर झाकण ठेवून चिकन शिजवून घ्या. चिकन शिजले की विस्तवावरून खाली उतरवून घेऊन चिकन दुसऱ्या भांड्यात काढून घ्या. मग कढईमधे ३ कप पाणी घेऊन मीठ व तेल घालून उकळी आलिकी त्यामध्ये अर्धे नुडलचे पाकीट घालून २ मिनिट शिजवून घेऊन त्यामध्ये चिकन घाला व ५ मिनिट मंद विस्तवावर शिजू द्या. रस्सा थोडा पातळ पाहिजे.
भात बनवण्यासाठी: एका मोठ्या भांड्यात ४ कप पाणी गरम करून त्यामध्ये मीठ, तेल व धुतलेले तांदूळ घालून मंद विस्तवावर शिजवून घ्या. मग थंड करायला ठेवा. भात मोकळा झाला पाहिजे.
एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये मिरे, दालचीनी, तमालपत्र, कांदा घालून २ मिनिट परतून घ्या मग त्यामध्ये चिरलेल्या भाज्या घालून २-३ मिनिट परतून घेऊन शिजवलेला भात व थोड्या शिजवलेल्या नुडल्स घालून ५ मिनिट परतून घ्या.
नुडल्स बनवण्यासाठी: एका भांड्यात ३-४ लप पाणी गरम करून त्यामध्ये मीठ व तेल घालून उकळी आलीकी राहिलेल्या नुडल्स घालून ५ मिनिट शिजवून घेऊन जास्तीचे पाणी काढून चाळणीवर काढून थंड करायला ठेवा.
सर्व्ह करण्यासाठी: चिकन राईस नुडल्स बीर्यानी सर्व्ह करतांना एका प्लेट मध्ये राईस घेऊन त्यावर चिकन घालून परत वरतून राईस घालून बाजूनी नुडल्स घाला व वरतून कांद्याच्या चकत्या व तळलेले काजू घालून गरम गरम सर्व्ह करा.