मँक् डोनल्ड सारखे व्हेज बर्गर: मँक् डोनल्ड सारखे व्हेज बर्गर म्हंटले की लहान मुलांना खूप आवडतात. हेच बर्गर जर आपण घरी बनवले तर कमी खर्चात जास्त बर्गर बनवता येतील. मँक् डोनल्ड सारखे व्हेज बर्गर बनवतांना ताजे बन वापरावे म्हणजे त्याची टेस्ट चांगली येते. बर्गर बनवतांना त्यामध्ये मियोनीज सॉस वापरला आहे त्यामुळे खूप छान चव येते. तसेच त्यामध्ये क्रंची टेस्ट येण्यासाठी लेट्युसची पाने घातली आहेत, गाजर, ताजे हिरवे मटार व उकडलेले बटाटे वापरून पँटीस बनवून घेतले आहेत, टोमाटो, कांदाच्या चकत्या व चीज वापरले आहे त्यामुळे हा बर्गर पौस्टिक तर आहेच.
The English language version of the same Macdonald Style Veg Burgers recipe and preparation method can be seen here – Mcdonald Style Veg-Burgers
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी अथवा ८ बर्गर बनतात
साहित्य:
८ ताजे बर्गर बन
२ कप मियोनीज सॉस
८ पँटीस
१ मोठ्या आकाराचा टोमाटो (चकत्या करून)
१ मोठ्या आकाराचा कांदा (चकत्या करून)
४ चीज क्यूब (चकत्या करून)
आइस बर्ग लेट्युस पाने (४-५ पाने)
बटर बन फ्राय करण्यासाठी (फक्त आतील एका बाजूनी)
मियोनीज सॉस बनवण्यासाठी साहित्य:
2 कप दुध
2 अंडे (फक्त पिवळे बलक)
4 टी स्पून कॉर्नफ्लोर
१ १/२ टी स्पून मोहरी पावडर
१ १/२ टी स्पून मीठ
४ टे स्पून साखर
२ टी स्पून तेल
१ टे पांढरे व्हेनीगर
पँटीस बनवण्याकरीता साहित्य:
४ मध्यम आकाराचे बटाटे
१ मध्यम आकाराचे गाजर
१/४ कप हिरवे मटार
१ टे स्पून आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
२ ब्रेड (चुरा)
१ टी स्पून लिंबूरस
१/४ कप कोथंबीर (चिरून)
मीठ चवीने
२ ब्रेड टोस्ट (पावडर)
तेल पँटीस फ्राय करण्यासाठी
सजावटीसाठी:
मीठ व पांढरी मिरी पावडर
कृती:
मियोनीज सॉस बनवण्यासाठी:
दुध गरम करून गार करून घ्या. एका बाऊलमध्ये अंडे फोडून अंड्यातील फक्त पिवळे बलक घ्या. त्यामध्ये साखर, मीठ, मोहरी पावडर, तेल घालून चांगले मिक्स करून घेऊन त्यामध्ये कॉर्नफ्लोर घालून मिक्स करून थोडे थोडे दुध मिक्स करून घ्या. दुधामध्ये कॉर्नफ्लोरची गुठळी होता कामा नये.
एका जाड बुडाच्या भांड्यात हे मिश्रण ओतुन लहान विस्तवावर शिजवायला ठेवा. मिश्रण चमच्याने सारखे हलवत रहा तसेच शिजवताना मिश्रणामध्ये गुठळी होता कामा नये. मिश्रण घट्ट झाली विस्तवावरून भांडे खाली उतरवून घ्या. दोन मिनिटांनी त्यामध्ये पांढरे व्हेनीगर घालून परत मिक्स करा.
मियोनीज सॉस तयार झाला.
पँटीस बनवण्यासाठी:
हिरवे मटार उकडून थोडे दाबून घ्या. गाजर किसून घ्या. बटाटे उकडून, सोलून, किसून घ्या. किसलेल्या बटाट्यामध्ये आले-लसूण-हिरवी पेस्ट, मीठ, ब्रेड क्रम, लिंबूरस, कोथंबीर, घालून मिक्स करून त्याचे एक सारखे आठ चपटे गोळे बनवून घ्या.
नॉन स्टिक तवा गरम करून थोडे तेल घालून त्यावर पँटीस दोनी बाजूनी गुलाबी रंगावर भाजून घ्या.
बर्गर बनवण्याकरीता:
बनचे दोन भाग करा. दोनी भागाला आतल्या बाजूनी थोडे बटर लाऊन गरम करून घेऊन त्यावर एक एक टे स्पून मियोनीज सॉस लाऊन त्यावर लेट्यूसचे पान ठेऊन त्यावर एक पँटीस ठेवा मग त्यावर कांदा, टोमाटोची एक स्लाईस ठेवून त्यावर मीठ व पांढरी मिरी पावडर भुरभुरून वरती बनचा दुसरा भाग ठेवा.
सर्व्ह करतांना पेपर नँपकीन मध्ये गुंडाळून सर्व्ह करा.