टेस्टी कुरकुरीत फाफडा: फाफडा ही एक छान गुजराती लोकांची लोकप्रिय डीश आहे. पण फाफडा आता महाराष्ट्र मध्ये सुद्धा लोकप्रिय आहे. आपण बघितले असेल फाफडा बेसनच्या पीठापासून बनवला जातो. फाफडा, जिलेबी व पपईची चटणी हे सर्व्ह केले जाते. माझी एक मैत्रीण आहे लता अतुल शहा मी तिच्या कडे दिवाळीला गेले होते तेव्हा तिने आम्हाला फाफडा सर्व्ह केला. मला प्रथम ही डीश काय आहे समजले नाही तेव्हा मी विचारले हे काय आहे तिने मला सांगितले फाफडा पण मी अश्या प्रकारचा फाफडा कधी बघितला नव्हता तिने स्वतः अश्या प्रकारची चवीस्ट डीश तयार केली होती. लताने फाफडा बनवतांना मुगडाळ, उडीद डाळ व जरासा पापडखार वापरला होता व इतका छान कुरकुरीत व चवीस्ट झाला होता. मला खूप आवडला मी तिला साहित्य व कृती विचारली व घरी येवून करून बघितला. तुम्हाला सुद्धा आवडेल. तुमच्या सुद्धा काही वेगवेगळ्या रेसिपी असतील तर सांगा मला करायला खूप आवडेल.
The Marathi language video of Tasty Crispy Fafda New Different Recipe For Diwali Faral can be seen on our YouTube Channel: Tasty Crispy Fafda New Different Recipe For Diwali Faral
The Marathi language version of this Fafda recipe and preparation method can be seen here – Crispy Fafda
बनवण्यासाठी वेळ: ९० मिनिट
वाढणी: १ किलोच्या बनतात
साहित्य:
५०० ग्राम उडीदडाळ (१/२ किलोग्राम)
५०० ग्राम मुगडाळ (१/२ किलोग्राम)
२ टी स्पून पापडखार
मीठ चवीने
तेल तळण्यासाठी
मीठ व लाल मिरची पावडर वरतून सजावटीसाठी
कृती:
उडीदडाळ व मुगडाळ बारीक दळून आणा. एका परातीत मुग-उडीद डाळीचे पीठ, पापडखार व मीठ मिक्स करून चाळून घ्या. मग त्यामध्ये थोडेसे पाणी घालून चांगले (खूप) घट्ट मळून घेऊन १० मिनिट बाजूला ठेवा. मग त्याचे एक सारखे ५-६ गोळे बनवा.
एक एक गोळा घेऊन चांगला खूप कुटायचा म्हणजे कुटून कुटून थोडा सैल करायचा. मग पोलपाटावर अगदी पातळ पोळी सारखा लाटायचा व लाटून झाल्यावर सुरीने लांब लांब पट्या सारखे कापून घ्या. कापून झाल्यावर एका पेपरवर ठेवा. अश्या प्रकारे सर्व गोळे लाटून घेऊन बाजूला ठेवा.
एका कढईमधे तेल गरम करून घ्या. तेल चांगले गरम झाले की गरम तेलात थोड्या थोड्या पट्या घालून कुरकुरीत तळून घ्या तळून झाल्याकी एक पेपरवर ठेवून त्यावर थोडेसे मीठ व लाल मिरची पावडर भुरभुरून मिक्स करा. अश्या प्रकारे सर्व पट्या तळून घेऊन वरतून मीठ व लाल मिरची पावडर घाला.
थंड झाल्यावर प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवा.
टीप: पीठ भिजवताना त्यामध्ये गरम तेल (मोहन) घालू नये.