अननसाचा सुधारस: अननसाचा सुधारस ही एक स्वीट डीश आहे. ह्या आगोदर आपण लिंबाचा चवीस्ट सुधारस बघितला. अननसाचा सुधारस हा सणावाराला किंवा घरी पार्टीला सुद्धा करायला छान आहे. अश्या प्रकारचा सुधारस महाराष्टात लोकप्रिय आहे. अननसाचा सुधारस बनवायला अगदी सोपा आहे. लहान मुलांना चपाती बरोबर द्यायला छान आहे ते आवडीने खातील. अननसाचा सुधारसची चव छान आंबटगोड अशी लागते.
The English language version of this Sudharas recipe and preparation method can be seen here – Ananas Sudharas
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ कप अननसाचे तुकडे
१ १/२ कप साखर
१/४ कप पाणी
१/४ टी स्पून अननसाचा ईसेन्स
८-१० केशर काड्या
कृती:
अननस सोलून म्हणजे त्याचे वरचे साल काढून घ्या. साल काढल्यावर त्याचे लहान तुकडे करून बाजूला ठेवा.
एका जाडबुडाच्या स्टीलच्या भांड्यात साखर व पाणी मिक्स करून घेऊन मंद विस्तवावर १०-१५ मिनिट ठेवा. मधून मधून हलवत रहा. साखरेचा थोडासा घट्ट पाक झाला पाहिजे.
साखरेचा पाक झाल्यावर त्यामध्ये अननसाचे तुकडे घालून मिक्स करून ५ मिनिट शिजवून घ्या. नंतर भांडे खाली उतरवून त्यामध्ये अननसाचा ईसेन्स व केशर घालून मिक्स करून थंड करायला ठेवा.
अननसाचा सुधारस थंड झाल्यावर बाटली मध्ये भरून ठेवा. हवा तेव्हा चपाती बरोबर सर्व्ह करा.