हॉटेल प्रमाणे पनीर-मश्रूम मसाला: आपण रोजच्या जेवणात पनीर व मश्रूमचे वेगवेगळे प्रकार बनवतो तसेच वेगवेगळ्या प्रकारे ग्रेव्ही बनवतो. आपल्याला हॉटेल मधील सर्व प्रकारच्या ग्रेव्ही आवडतात. विशेष म्हणजे आपण हॉटेलमध्ये गेलोकी पनीरच्या तसेच मश्रूमच्या ग्रेवी ऑर्डर करतो कारण त्या आपल्याला खूप आवडतात. लहान मुले ह्या ग्रेवी अगदी आवडीने खातात. हॉटेल प्रमाणे पनीर-मश्रूम मसाला आपल्याला घरी बनवतात आलीतर किती छान तसेच कमी खर्चात छान व भरपूर बनवता येते.
The English language version of this same Paneer-Mushroom Gravy recipe and preparation method can be seen here – Paneer-Mushroom Masala Gravy
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
७-८ मश्रूम
१ कप पनीर
१/४ कप टोमाटो प्युरी
१ टे स्पून दही
१ टे स्पून फ्रेश क्रीम
१ टे स्पून काजू-बदाम पावडर
१/४ टी स्पून कसुरी मेथी
साखर व मीठ चवीने
मसाल्याकरीता:
१ टे स्पून तेल
१ मोठा कांदा
८ लसूण पाकळ्या १” आले तुकडा
२ हिरव्या मिरच्या
१ टे स्पून खसखस
२ टे स्पून सुके खोबरे
२ टी स्पून लाल मिरची पावडर (कश्मीरी)
१ टी स्पून गरम मसाला
फोडणी करीता:
१ टे स्पून तेल
४ काळे मिरे
२ तमलपत्र
४ हिरवे वेलदोडे
कृती:
मश्रूम स्वच्छ करून, धुवून एका मश्रूमचे चार तुकडे करा. टोमाटो उकडून, सोलून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. कसुरीमेथी थोडीशी गरम करून चुरून घ्या. कांदा चिरून घ्या.
मसाल्या करीता: कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये कांदा, आले-लसूण, हिरवी मिरची, खसखस, सुके खोबरे घालून ४-५ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. मग मिक्सरमध्ये बारीक वाटुन घ्या.
ग्रेव्ही करीता: कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये मिरे, तमलपत्र, हिरवे वेलदोडे, वाटलेला मसाला घालून ५ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. मग त्यामध्ये टोमाटो प्युरी, लाल मिरची पावडर, गरम मसाला, घालून ३-४ मिनिट परतून घेऊन त्यामध्ये मीठ, दही, घालून मिक्स करून २ मिनिट शिजवून घ्या.
नंतर त्यामध्ये मश्रूम, एक कप पाणी घालून २-३ मिनिट शिजू द्या. मग त्यामध्ये पनीर, फ्रेश क्रीम, काजू-बदाम पावडर, कसुरी मेथी घालून मिक्स करून एक चांगली उकळी येऊ द्या.
गरम गरम पनीर मश्रूम मसाला पराठा बरोबर किंवा जीरा राईस बरोबर सर्व्ह करा.