पुलाव बिर्याणी पुलाव: बिर्याणी पुलाव ही एक छान वेगळीच जेवणातील डीश आहे. ह्या पुलावामध्ये टोमाटो, फ्लॉवर, शिमला मिर्च, बीन्स, गाजर व बटाटे वापरले आहेत त्यामुळे हा पुलाव पौस्टिक तर आहेच. बिर्याणी पुलाव लहान मुलांना तसेच मोठ्यांना सुद्धा नक्की आवडेल. हा पुलाव बनवायला सोपा आहे तसेच अश्या प्रकारचा पुलाव बनवला की त्यासोबत जास्त काही बनवावे लागत नाही.
बनवण्यासाठी वेळ:६० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२ कप बासमती तांदूळ
१ मध्यम आकाराचा कांदा
१/४ कप कॉली फ्लॉवर
१/४ कप शिमला मिर्च
१/४ कप फ्रेंच बीन्स
१ मध्यम आकाराचा बटाटा
१ मोठा कांदा
१० काजू
२ कप कोथंबीर
१ कप पुदिना
४ हिरव्या मिरच्या
१/४ कप दही
१/२ कप दुध
१/४ कप तेल
२ टे स्पून तूप
गरम मसाला वाटण्यासाठी: हा गरम मसाला मिक्सरमध्ये बारीक वाटुन घ्यावा)
३-४ लवंग, हिरवे वेलदोडे, मिरे, तमलपत्र (हे प्रतेकी घ्यावे)
१ स्टारफुल
१ छोटा दालचीनी तुकडा
१ टी स्पून शहाजिरे
फोडणी साठी:
३-४ लवंग, हिरवे वेलदोडे, मिरे, तमलपत्र (हे प्रतेकी घ्यावे)
१ स्टारफुल
१ छोटा दालचीनी तुकडा
१ टी स्पून शहाजिरे
कृती:
तांदूळ धऊन बाजूला ठेवा. भाज्या लांबट आकारात चिराव्यात. १ कप कोथंबीर १/२ कप पुदिना व हिरव्या मिरच्या बारीक वाटुन घ्या. राहिलेली कोथं बीर, पुदिना व हिरवी मिरची बारीक चिरून घ्या.
गरम मसाला मिक्सरमध्ये बारीक वाटुन घ्या.
धुतलेल्या तांदळाला मीठ, चिरलेली कोथंबीर-पुदिना आणि वाटलेला मसाला अलगद लावावा.
एका जाडबुडाच्या भांड्यात तेल गरम करून एक टे स्पून तूप घालावे मग त्यामध्ये फोडणी साठी गरम मसाला घालून परतून घ्या. कांदा, टोमाटो, चिरलेल्या भाज्या, मीठ, वाटलेला मसाला थोडे परतून घ्या मग ४ कप पाणी घालावे, पाण्याला उकळी आलीकी लगेच धुतलेले तांदूळ घालून मिक्स करून ५-७ मंद विस्तवावर भात शिजू द्यावा. तांदूळ शिजला की त्यामध्ये दही घालून हळूवार हलवून भात शिजू द्यावा. जर तांदूळ शिजला नसेलतर त्यामध्ये दुध घालून हलवून तसेच झाकून मंद विस्तवावर एक मिनिट शिजू द्यावा. शेवटी बाजूनी तूप सोडावे.
गरम गरम व्हेज बिर्याणी पुलाव रायत्या बरोबर सर्व्ह करावा.