बटर चिकन: बटर चिकन ही डीश आपण रोजच्या जेवणात किंवा पार्टीला करू शकतो. बटर चिकन ही डीश स्वादीस्ट लागते. तसेच ह्या मध्ये जास्त मसाला नाही. बटर चिकन बनवतांना बटर , टोमाटो प्युरी , व फ्रेश क्रीम वापरले आहे त्यामुळे ह्याला एक रीचनेस आला आहे. बटर चिकन ही एक उत्तर भारतीय किंवा पंजाबी डीश आहे. पण आता ती महाराष्ट्रात तसेच भारतात सर्वत्र लोकप्रिय झाली आहे.
The English language version of this Chicken Gravy recipe and its preparation method can be seen here – Spicy Butter Chicken Gravy
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
५०० ग्राम चिकन (बोनलेस)
१ टे स्पून लिंबूरस
१ टी स्पून लाल मिरची पावडर (कश्मीरी)
मीठ चवीने
चिकन मँरीनेट करण्यासाठी:
१ टे स्पून आले-लसूण पेस्ट
१ कप दही
१/२ टी स्पून गरम मसाला
२ टे स्पून मोहरी तेल
ग्रेव्ही करण्यासाठी:
४ मोठे टोमाटो
१ १/२ टे स्पून आले-लसूण पेस्ट
2 टे स्पून लाल मिरची पावडर (कश्मीरी)
२ टे स्पून काजू-खसखस पेस्ट
१ टी स्पून धने-जिरे पावडर
१/२ कप ताजे क्रीम
२ टे स्पून मध
फोडणी करीता:
१ टे स्पून बटर
४-५ हिरवे वेलदोडे
२ तमलपत्र
१ टी स्पून कसुरी मेथी
मीठ चवीने
सजावटीसाठी:
कोथंबीर (चिरून) क्रीम
कृती:
टोमाटो उकडून, सोलून प्युरी करून घ्या. चिकन पिसेस धुऊन एका बाऊलमध्ये ठेऊन त्याला लाल मिरची पावडर, मीठ व लिंबूरस लाऊन फ्रीजमध्ये अर्धातास ठेवा.
फ्रीजमधून चिकन बाहेर काढून चिकनला दही, गरम मसाला, आले-लसूण पेस्ट लाऊन मिक्स करून परत फ्रीजमध्ये दोन तास ठेवा. दोन तासा नंतर चिकन बाहेर काढा.
कढईमधे मोहरी तेल गरम करून त्यामध्ये चिकन घालून शिजेपरंत फ्राय करा.
कढईमधे बटर गरम करून त्यामध्ये हिरवे वेलदोडे, तमलपत्र, आले-लसूण पेस्ट घालून धने-जिरे पावडर घालून एक मिनिट फ्राय करून घ्या. मग त्यामध्ये टोमाटो प्युरी, घालून ५-७ मिनिट परतून घेऊन फ्राय केलेले चिकन, १ कप पाणी घालून मंद विस्तवावर ५-७ मिनिट शिजवून घ्या.
नंतर शिजलेल्या चिकनमध्ये फ्रेश क्रीम, काजू-खसखस पेस्ट घालून मिक्स करून २-३ मिनिट मंद विस्तवावर ठेवा.
बटर चिकन झाल्यावर त्यामध्ये मध घालून मिक्स करा.
गरम गरम जीरा राईस बरोबर किंवा पराठा बरोबर सर्व्ह करा. सर्व्ह करतांना वरतून चिरलेली कोथंबीर व क्रीम घाला.