चिकन मियोनीज सॉस: चिकन मियोनीज सॉस हा एक स्वादिस्ट असा सॉस आहे. चिकन मियोनीज सॉस बनवायला अगदी सोपा आहे. व लवकर होणारा आहे. हा सॉस ७-८ दिवस फ्रीज मध्ये चांगला रहातो. ब्रेड बरोबर ह्याची चव अप्रतीम लागते. सकाळी नाश्त्याला किंवा संद्याकाळी चहा बरोबर चिकन मियोनीज सॉस ब्रेडला लाऊन सर्व्ह करता येते.
The English language version of this Chicken Mayonnaise recipe and preparation method can be seen here – Homemade Chicken Mayonnaise Sauce
बनवण्यासाठी वेळ: : ४५ मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य:
चिकन बनवण्यासाठी:
४-५ मोठे चिकनचे तुकडे
१ टे स्पून तेल
१ टे स्पून लसूण पेस्ट
१ टी स्पून मिरे पावडर
१/४ कप पाणी
मीठ चवीने
मियोनीज सॉस करीता:
२ कप दुध
२अंडी (पिवळे बलक फक्त)
2 टे स्पून कॉर्नफ्लोर
१ टी स्पून मोहरी पावडर
१ टे स्पून साखर
१ टे स्पून तेल
१ टे स्पून व्हेनीगर
मीठ चवीने
कृती:
चिकन करीता:
चिकनचे तुकडे स्वच्छ करून धुऊन घ्या.
कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये लसूण पेस्ट घालून एक मिनिट परतून घेऊन त्यामध्ये चिकनचे पिसेस व १/४ कप पाणी घालून कढईवर स्टीलची ताटली ठेवून ताटलीवर १/४ कप पाणी घाला व ५-७ मिनिट मंद विस्तवावर चिकन शिजवून घ्या. कढई वरची प्लेट काढून चिकनमध्ये मीठ व मिरे पावडर घालून थोडे कोरडे होई परंत शिजवून घ्या व विस्तव बंद करून कढई खाली उतरवून घ्या. चिकन थंड झाल्यावर त्याचे लांबट असे तुकडे करून बाजूला ठेवा.
मियोनीज सॉस करीता:
दुध गरम करून गार करून घ्या. एका बाऊलमध्ये अंडे फोडून अंड्यातील फक्त पिवळे बलक घ्या. त्यामध्ये साखर, मीठ, मोहरी पावडर, तेल घालून चांगले मिक्स करून घेऊन त्यामध्ये कॉर्नफ्लोर घालून मिक्स करून थोडे थोडे दुध मिक्स करून घ्या. दुधामध्ये कॉर्नफ्लोरची गुठळी होता कामा नये.
एका जाड बुडाच्या भांड्यात हे मिश्रण ओतुन लहान विस्तवावर शिजवायला ठेवा. मिश्रण चमच्याने सारखे हलवत रहा तसेच शिजवताना मिश्रणामध्ये गुठळी होता कामा नये. मिश्रण घट्ट झाली विस्तवावरून भांडे खाली उतरवून घ्या. दोन मिनिटांनी त्यामध्ये पांढरे व्हेनीगर घालून परत मिक्स करा.
मियोनीज सॉस तयार झाला.
सॉस थंड झाल्यावर त्यामध्ये शिजवलेले चिकन मिक्स करून घ्या. म्हणजे चिकन मियोनीज सॉस तयार झाला.