पाव भाजी पुलाव / बिर्याणी: पाव भाजी पुलाव ही एक छान डीश आहे. ह्या आगोदर आपण पाव भाजी कशी बनवायची ते पाहिले. नंतर एक कल्पना सुचली की आपण नेहमी एक कॉम्बीनेशन करतो की पाव भाजी व पुलाव असे करण्या आयवजी पाव भाजी पुलाव केला तर कसे लागेल. पाव भाजी पुलाव बनवल्यावर आमच्या घरी खूप आवडला. पाव भाजी पुलाव हा बनवायला सोपा आहे व सगळ्यांना आवडेल असा आहे. हा पुलाव बनवतांना ह्यामध्ये भाजी, ब्रेड स्लाईस, व्हाईट सॉस व चीज वापरले आहे.
पाव भाजी पुलाव बनवण्यासाठी वेळ: ८० मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य:
भाजी बनवण्यासाठी:
२ मोठे आकाराचे बटाटे (उकडून, सोलून)
१ कप शिमला मिर्च (बारीक चिरून)
१ कप कॉलीफ्लॉवर (किसून)
१/४ कप मटारचे दाणे
१ कप कोथंबीर (बारीक चिरून)
१ टे स्पून लिंबूरस
मीठ चवीने
फोडणी साठी
१ टे स्पून तेल
१ मोठा कांदा (बारीक चिरून)
१ मोठे टोमाटो (बारीक चिरून)
१ टे स्पून आले-लसूण पेस्ट
४ मध्यम आकाराच्या हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
१/२ टे स्पून लाल मिरची पावडर
१/२ टी स्पून हळद
१ टे स्पून पावभाजी मसाला
पुलाव करण्यासाठी:
१ कप बासमती तांदूळ
२ कप पाणी
१ टे स्पून बटर (लोणी)
१ छोटा कांदा (बारीक चिरून)
१ टे स्पून आले-लसूण-हिरवी मिरची (बारीक चिरून)
१ १/२ टी स्पून पाव भाजी मसाला
मीठ चवीने
व्हाईट सॉस साठी:
१ टी स्पून बटर
१ टे मैदा
१ कप दुध
१ टे स्पून चीज (किसून)
मिरी पूड व मीठ चवीने
८ ब्रेड स्लाईस
२ चीज क्यूब (किंवा १/२ कप चीज किसून)
१ टे स्पून बटर
कृती:
भाजी बनवण्यासाठी:
बटाटे उकडून, सोलून कुस्कुरून घ्या. शिमला मिर्च, कोथंबीर, कांदा, टोमाटो, हिरवी हिरवी मिरची बारीक चिरून घ्या. कॉलीफ्लॉवर किसून धुवून घ्या. मग कॉलीफ्लॉवर व मटारचे दाणे थोडेसे पाणी घालून शिजवून घ्या.
एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये कांदा, टोमाटो, आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची व शिमला मिरची घालून ५-७ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, मीठ घालून मिक्स करून त्यामध्ये कॉलीफ्लॉवर, बटाटे, लिंबू रस व एक ते दीड कप पाणी घालून मग पाव भाजी मसाला, लिंबूरस, थोडी कोथंबीर घालून मिक्स करून चांगल्या दोन वाफा येवू द्या.
पुलाव करण्यासाठी:
प्रथम तांदूळ धुवून १० मिनिट बाजूला ठेवा. मग कुकरमध्ये दोन कप पाणी उकळून घेऊन त्यामध्ये धुतलेले तांदूळ घालून मिक्स करून दोन शिट्या काढा, कुकर थंड झाल्यावर शिजलेला भात बाहेर काढून थंड करायला ठेवा.
एका फ्राईग पँन मध्ये बटर गरम करून बारीक चिरलेला कांदा, आले-लसूण-हिरवी मिरची घालून थोडे परतून घेऊन तवा पुलाव मसाला, मीठ घालून मिक्स करून शिजवलेला भात घालून मिक्स करून परतून घ्या.
व्हाईट सॉस बनवण्यासाठी:
एका कढईमधे बटर गरम करून मैदा घालून दोन मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये हुळूहळू दुध मिक्स करत सारखे मंद विस्तवावर हलवत रहा, गुठळी होता कामा नये. मैद्याचे मिश्रण थोडे घट्ट झाले की त्यामध्ये मीठ व किसलेले चीज घालून एक मिनिट शिजू द्या.
पाव भाजी पुलाव बनवण्याची सर्व तयारी झाली आता ह्याचे थर देऊन १० मिनिट बेक करायचे, त्यासाठी खाली दिलेली कृती बघा.
एक बेकिंग बाऊलला बटर लाऊन मग त्यावर चार बेड स्लाईस ठेऊन त्यावर मग त्यावर बनवलेली निम्मी भाजी घालून त्यावर बनवलेला निम्म्मा व्हाईट सॉसचा थर देऊन निम्मे किसलेले चीज घाला वर शिजवलेला भात परत ब्रेड, भाजी, व्हाईट सॉस व चीज पसरवून घ्या.
ओव्हनमध्ये बाऊल ठेवून २०० डी. से. ग्रे. तापमानावर १० मिनिट बेक करून घ्या.
गरम गरम पाव भाजी पुलाव सर्व्ह करा.