चटपटीत चकली चाट: चटपटीत चकली चाट ही एक लहान मुलांसाठी छान डीश आहे. बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. चकली चाट बनवतांना चुरमुरे, चकली, कांदा, टोमाटो, कोथंबीर, लिंबूरस, चाट मसाला वापरला आहे. दिवाळीच्या फराळ उरला की त्या उरलेल्या फराळाचे काही ना काही बनवता येते. चकली जर उरली तर आपल्याला अशा प्रकारचा चाट बनवता येतो.
The English language version of this Chaat recipe and its preparation method can be seen here – Chatpata Chakli Chaat
बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
३ कप चुरमुरे
७-८ चकल्या
१ मध्यम आकाराचा कांदा
१ मध्यम आकाराचा टोमाटो
१ छोटी काकडी
१/४ कप कोथंबीर (चिरून)
१ टी स्पून चाट मसाला
१ मध्यम आकाराचे लिंबू (लिंबूरस)
मीठ चवीने
कृती:
प्रथम कांदा, काकडी, टोमाटो, कोथंबीर बारीक चिरून घ्या. चकलीचे २” आकाराचे तुकडे करा.
एका मोठ्या आकाराच्या बाऊल मध्ये कांदा, टोमाटो, काकडी, कोथंबीर थोडेसे मीठ, चाट मसाला घालून मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये चुरमुरे, चकलीचे तुकडे घालून मिक्स करून घ्या.
एका प्लेटमध्ये सर्व्ह करा, सर्व्ह करतांना वरतून चिरलेला कांदा, कोथंबीर, टोमाटो घालून सजवा.