पौस्टिक कुरकुरीत स्ट्रिप्स: पौस्टिक कुरकुरीत स्ट्रिप्स ह्या मुलांना डब्यात किंवा दुपारी दुधा बरोबर द्यायला छान आहेत. ह्या स्ट्रिप्स पौस्टिक कश्या आहेततर ह्यामध्ये चणाडाळ, मुगडाळ, तांदूळ, ज्वारी, बाजरी वापरली आहे. म्हणजेच आपण भाजणीचे थालीपीठ बनवतो त्यापासून ह्या स्ट्रिप्स बनवल्या आहेत. दुधाबरोबर रोज बिस्कीट, टोस्ट देण्यापेक्षा अश्या विविध प्रकारच्या पौस्टिक डिशेष आपण घरी बनवू शकतो.
The English language version of the same Atta Snack recipe and it preparation method can be seen here – Crispy Dal Atta Stripes
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ५-६ जणासाठी
साहित्य:
स्ट्रिप्सचे पीठ बनवण्यासाठी:
(खालील तीनही डाळी थोड्या भाजून बारीक दळून आणा)
२ कप चणाडाळ
२ कप उडीदडाळ
२ कप मुगडाळ
स्ट्रिप्स बनवण्यासाठी:
२ कप डाळीचे दळलेले पीठ
२ टे स्पून वनस्पती तूप
१ टी स्पून कसुरी मेथी
१०-१२ कडीपत्ता पाने
१०-१२ पुदिना पाने
२ टी स्पून लाल मिरची पूड
२ टी स्पून धने-जिरे पावडर
१/२ टी स्पून हिंग
मीठ चवीने
तेल स्ट्रिप्स तळण्यासाठी
कृती:
कसुरी मेथी थोडीशी गरम करून कुस्कुरून घ्या. पुदिना व कडीपत्ता पाने धुवून बारीक चिरून घ्या.
एका बाऊलमध्ये डाळीचे पीठ, कसुरीमेथी, कडीपत्ता, पुदिना, लाल मिरची पूड, धने-जिरे पावडर, हिंग, मीठ मिक्स करून घ्या मग त्यामध्ये गरम तूप घालून मिक्स करून थोडे पाणी वापरून घट्ट पीठ मळून घ्या. मग मळलेल्या पीठाचे एक सारखे चार गोळे बनवून बाजूला ठेवा.
कढईमधे तेल गरम करायला ठेवा. चकलीचा सोरया घेऊन त्याला त्यामध्ये मळलेला एक गोळा ठेऊन गरम गरम तेलामध्ये पट्या घाला मध्यम विस्तवावर छान कुरकुरीत पट्या तळून घ्या.
गरम गरम स्ट्रिप्स सर्व्ह करा. सर्व्ह करतांना वरतून आवडत असेलतर चाट मसाला घालून सर्व्ह करा.