घरी आले-लसूण पेस्ट कशी बनवायची: आले-लसूण हे आपल्याला रोजचा स्वयंपाक रोज लागत असते. आले-लसूण वापरल्या शिवाय आपल्या जेवणाला चवपण येत नाही. रोज आले सोलून वाटायचे, लसूण सोलून वाटायचा हे करायला बराच वेळ जातो. तसेच असंख्य स्त्रिया कामा निमिताने घरा बाहेर पडतात. त्यामुळे त्यांना वेळेच्या आत जेवण बनवून घरा बाहेर पडायचे असते. जर आपण सुट्टीच्या दिवशी आले-लसूण पेस्ट बनवून फ्रीजमध्ये ठेवली तर आपला रोजचा बराच वेळ वाचू शकतो. आपण फ्रीजमध्ये आले-लसूण पेस्ट बनवून ठेवली तर फक्त काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात म्हणजे ही पेस्ट जास्त दिवस टिकेल.
The English language version of the same recipe can be seen her – Ginger-Garlic Paste
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: २ कप
साहित्य:
१ कप आले
१ कप लसूण
१/४ टी स्पून हळद
३/४ टी स्पून तेल
कृती:
आले स्वच्छ धुवून, साले काढून तुकडे करून घ्या. लसूण सोलून त्याचे तकडे करून घ्या.
प्रथम मिक्सर मध्ये आले, हळद व तेल वाटुन घ्या. मग त्यामध्ये लसूण घालून मिक्सरमध्ये अगदी बारीक पेस्ट करून घ्या.
आले-लसूण पेस्ट वाटुन झाल्यावर एका स्वच्छ काचेच्या बाटलीत पेस्ट काढून घट्ट झाकण] लाऊन बाटली फ्रीजमध्ये ठेवा.
आले-लसूण पेस्ट बनवल्यावर ती रोज कशी वापरावी म्हणजे ती जास्त दिवस टिकेल.
१) आले-लसूण पेस्ट बाटली मधून काढताना स्वच्छ व कोरडा चमचा वापरा. बोट वापरून पेस्ट काढू बका.
२) जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा बाटली बाहेर काढून पेस्ट जेव्हडी हवी तेव्हडी घेऊन परत लगेच बाटली फ्रीज मध्ये ठेवा.
३) आल-लसूण पेस्ट बनवतांना आपण हळद व तेल वापरले आहे कारण की हळद व तेलानी रंग छान येतो.
४) चांगल्या कोरड्या केलेल्या बाटलीत आल-लसूण पेस्ट भरून ठेवा. बाटलीचे झाकण घट्ट बंद करा. म्हणजे टी जास्त दिवस चांगली राहील व टिकेल सुद्धा.
५) जर तुम्हांला एका महिन्याच्यावर आले=लसूण पेस्ट टिकवायची असेल तर त्यामध्ये एक टेबल स्पून व्हेनीगर व एक टेबल स्पून ऑंलीव्ह ओईल किंवा इतर कोणतेही तेल घालून शकता. पण तेल गरम करून थंड करायचे व मगच घालायचे.