दलिया खीर: दलिया खीर ह्यालाच म्हणतात गव्हाची खीर किंवा लापशीची खीर. दलिया हा चांगल्या प्रतीच्या गहू पासून बनवतात. दलिया हा पौस्टिक आहे. लहान मुलांना नाश्त्याला द्यायला छान आहे. दलिया पासून शिरा, खीर, उपमा बनवता येतो.
दलिया खीर बनवतांना साजूक तूप, सुके खोबरे, खसखस, सुकामेवा व दुध वापरले आहे. त्यामुळे ही खीर खूप पौस्टिक आहे.
The English language version of this Kheer recipe can be seen here – Nutritious Daliya Kheer
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ कप दलिया
१ टे स्पून तूप
१/२ लिटर दुध
१/२ कप साखर
१/४ कप सुके खोबरे (किसून)
१/४ कप खारीक पावडर (जाडसर)
१ टे स्पून खसखस
१/४ कप काजू, बदाम, पिस्त (जाडसर कुटून)
१ टी स्पून वेलचीपूड
कृती:
प्रथम कढईमधे तूप गरम करून त्यामध्ये दलिया २-३ मिनिट परतून घेऊन मग थंड करायला ठेवा. दलिया थंड झाल्यावर एका स्टीलच्या भांड्यात दलिया व १/२ कप पाणी घालून कुकरमध्ये ठेऊन तीन शिट्या काढा.
सुके खोबरे किसून घ्या. मग सुके खोबरे, खसखस व खारीक पावडर थोडी परतून घ्या.
एका मध्यम आकाराच्या कढईमधे शिजवलेला दलिया, गरम दुध, साखर, सुके खोबरे, खसखस, खारीक पावडर घालून ७-८ मिनिट मंद विस्तवावर शिजू द्या. मग त्यामध्ये वेलचीपूड, सुकामेवा घालून मिक्स करून २ मिनिट शिजवून घ्या.
गरम गरम दलिया खीर सर्व्ह करा.