महाराष्ट्रीयन स्टाईल हिरव्या मसाल्याची चिकन बिर्याणी: महाराष्ट्रीयन स्टाईल हिरव्या मसाल्याची चिकन बिर्याणी ही आपण दुपारी अथवा रात्री जेवणात बनवू शकतो. चिकन बिर्याणी आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो. ही बिर्याणी मी हिरव्या मसाल्याची बनवली आहे. तसेच बनवायला सोपी व झटपट होणारी आहे. चवीला अगदी चवीस्ट आहे.
महाराष्ट्रीयन स्टाईल हिरव्या मसाल्याची चिकन बिर्याणी फ्रा मसाल्याची नाही त्यामुळे मुलांना व मोठ्यांना सुद्धा खूप आवडेल. ह्या बिर्याणी साठी लागणारा गरम मसाला सुद्धा घरी बनवला आहे.
The English language version of the same Biryani recipe and preparation method can be seen here – Typical Maharashtrian Chicken Biryani
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
चिकन मुरण्यासाठी वेळ: २ तास
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२ कप बासमती तांदूळ
२५० ग्राम चिकन
१ टे स्पून तूप
१/२ कप दही
१ कप कांदा (कांदा उभा पातळ चिरून तळून घ्या.)
सुकामेवा (काजू, बदाम व किसमिस)
मसाला वाटण्यासाठी:
१ टे स्पून तेल
३ टे स्पून चॉकलेटी कांदा पेस्ट (१ टे स्पून तेल व १/२ कप कांदा चॉकलेटी रंग येई परंत परतून घेऊन मिक्सर मध्ये वाटुन घ्या.)
१/२ कप कोथंबीर (चिरून)
२० पुदिना पाने
१/२ टे स्पून धने-जिरे पावडर
१ टे स्पून आले-लसूण पेस्ट
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/२ टी स्पून हिरवी मिरची
१ टी स्पून गरम मसाला
(गरम मसाला बनवण्यासाठी: लवंग, दालचीनी, मिरे प्रतेकी १० ग्राम शहाजिरे ५ ग्राम जायपत्री ५ ग्राम हिरवे वेलदोडे ४-५ हे सर्व जीनस कोरडे परतून घ्या मग बारीक वाटुन घ्या.)
मीठ चवीने
कृती:
तांदूळ धुवून बाजूला ठेवा. उभा पातळ चिरलेला कांदा तळून घ्या. चिकनचे तुकडे धुवून घेऊन त्याला वाटलेला मसाला, दही, लाऊन २-३ तास तसेच भिजत ठेवा. मग कुकरमध्ये चिकन ठेवून एक शिट्टीकाढून ५-१० मिनिट मंद विस्तवावर ठेवा.
एका जाडबुडाच्या मोठ्या भांड्यात ८-९ कप पाणी गरम करून त्यामध्ये ६-७ मिरे, ३-४ लवंग, २-३ तमलपत्र, २-३ दालचिनीचे तुकडे, १ टी स्पून तेल, १ टी स्पून मीठ व धुतलेले तांदूळ घालून १०-१२ मिनिट भात शिजू द्या. मग शिजलेला भात चाळणीवर ओतुन जास्तीचे पाणी काढून त्यावर थंड पाणी ओता. मग भात थंड करण्यासाठी बाजूला ठेवा. भात शिजवताना काळजी घ्या की भात ३/४ शिजला पाहिजे खूप शिजत कामा नये.
एका सॉस पँनला आतून तुपाचा हात लाऊन त्यामध्ये शिजवलेले निम्मे चिकन त्यावर शिजवलेला निम्मा भात, तळलेला निम्मा कांदा, सुकामेवा घालून परत सांगितल्याप्रमाणे थर द्या. थर देऊन झाल्यावर भांड्यावर झाकण ठेऊन १० मिनिट मंद विस्तवावर छान वाफ येऊ द्या.
गरम गरम चिकन बिर्याणी रायत्या बरोबर सर्व्ह करा.